शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कारवर दुचाकी आदळून विद्युत सहायक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:02 IST

मित्राला सोडून घरी परत येत असताना दुचाकी कारवर आदळून अविनाश बापु पाटील (३०, मुळ रा.मोहाडी, ता. धुळे, ह.मु.अयोध्या नगर, जळगाव) हा तरुण विद्युत सहायक जागेवरच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ घडली.

ठळक मुद्दे महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ  मध्यरात्री अपघात  मित्राला सोडून परत येत असताना घडली दुर्घटना दोन वर्षापूर्वीच लागला होता नोकरीला

जळगाव : मित्राला सोडून घरी परत येत असताना दुचाकी कारवर आदळून अविनाश बापु पाटील (३०, मुळ रा.मोहाडी, ता. धुळे, ह.मु.अयोध्या नगर, जळगाव) हा तरुण विद्युत सहायक जागेवरच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश पाटील हा नवीन एमआयडीसी दक्ष १ या ठिकाणी विद्युत सहायक म्हणून नियुक्तीला होता. मंगळवारी रात्री तो दुचाकीने (क्र.एम.एच.१९ ए.एस.७७१०)मित्राला सोडायला शिव कॉलनी परिसरात गेलेला होता. तेथून परत येत असताना रात्री १२ वाजता विद्युत कॉलनीजवळ समोरुन येणा-या कारवर (क्र.एम.एच.१९सी.यु.८९२१) दुचाकी आदळली. दोन्ही वाहने वेगात असल्याने वाहनांचा चुराडा होण्यासह डोक्याला गंभीर मार लागल्याने अविनाश जागेवरच गतप्राण झाला. दरम्यान, सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मोहाडी, ता.धुळे येथे अंत्यसंस्कारासाठी जळगावचे कर्मचारीही सोबत रवाना झाले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास हवालदार विनोद शिंदे करीत आहेत.दोन वर्षापूर्वीच लागला नोकरीलाअविनाश हा दोन वर्षापूर्वी १७ मे २०१७ रोजी महावितरणमध्ये विद्युत सहायक म्हणून नोकरीला लागला होता. अविवाहित असल्याने अयोध्या नगरात भाड्याने खोली घेऊन वास्तव्याला होता. मोहाडी, धुळे येथे वडील रिक्षा चालवतात. त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण आहे. अविनाश हा एकुलता होता. अविनाश यांचे मुळ गाव पाचोरा तालुक्यातील आहे, मात्र रोजगारासाठी ते मोहाडी, ता.धुळे येथे स्थायिक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव