शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
3
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
4
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
5
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
6
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
7
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
8
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
9
१३ दागिन्यांची दुकाने, ६ रेस्टॉरंट्स आणि ४ सुपरमार्केटचा मालक, तरीही दररोज चालवतात टॅक्सी; का?
10
T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन संघात फिरकीपटूंचा भरणा! ३ अनफिट खेळाडूंचीही वर्ल्ड कपसाठी निवड
11
उत्तर-दक्षिण ते पूर्व-पश्चिम; 2026 मध्ये देशाला मिळणार चारही दिशा जोडणारे 8 नवे एक्सप्रेसवे
12
"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
14
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
15
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
16
नव्या वर्षात मुंबई, कोकण, पुण्यात म्हाडाची लॉटरी; आचारसंहिता संपताच प्रक्रियेला वेग 
17
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
18
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
19
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
20
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

मातृ दिन विशेष- पती निधनानंतर कष्टाचा 'विडा उचलत बेबाबाईने चढवली लेकरांच्या आयुष्याला 'पाना’ची लाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:25 IST

मुलांच्या शिक्षणासाठी बेबाबाईने मोठ्या खस्ता खाल्ल्या.

ठळक मुद्देशिंदीत  ‘पानमंदिर ते घर एक मंदिर, अशी महती मातेचीकुटुंब चांगले स्थिरस्थावर झाले आहे.

संजय हिरे खेडगाव, ता.भडगाव :  पानविडा, विड्याचे पान व एकूणच पानठेला चालविणे याआधी पुरुषप्रधान संस्कृतीत महिलासांठी हे क्षेत्र निषिद्ध मानले गेले. अशा स्थितीत शिंदीतील बेबाबाई मगन सोनार (बाविस्कर) यांनी मात्र पतीनिधनानंतर त्यांचेच उपजीविकेचे साधन असलेली पानटपरी त्यांच्या मागे ३५ वर्षापासून चालवत, रंगणा-या पानविड्यासम आपल्या आयुष्यांचे पान सजविले आहे. पानमंदिरातून मुलाबाळांचे घर एक मंदिर केले आहे.

स्टॅण्डवर टाकली पानटपरीमूळचे तापीकाठच्या बामगावचे हे कुंटुंब शिंदी, ता.भडगाव या बेबाबाईच्या माहेरीच वास्तव्यास आले. सोनार म्हटले म्हणजे सोनारकी आली परंतु परिस्थिती मोलमजुरीची. यामुळे हा व्यवसाय दूरच, चाचभर शेती नाही. शिंदीतील प्रसिध्द तमाशा कलावंत धोंडू-कोंडू यांच्या लोकनाट्य मंडळात जुन्या टमटम नामक मोटारगाडीचे मगन सोनार हे चालक झाले. गाडीचे हँण्डल मारुन मारुन त्यांना दमा जडला म्हणून शिंदी स्टँण्डवर उत्पन्नाचे साधन म्हणून पानटपरी टाकली. पुढे त्यांचे निधन झाले. जबाबदारी बेबाबाई यांच्यावर आली. लहान-लहान दोन मुले, दोन मुली. गावात भाऊ-भावजयी होतेच. शिवाय माहेरच्या माणसांनी भावाप्रमाणे साथ, हिंमत दिली. पानटपरीचा व्यवसायच पुढे चालविण्याचे ठरले. सकाळी शेतावर मजुरी जाण्याआधी व संध्याकाळी शेतमजुरीवरुन आल्या म्हणजे बेबाबाई पानटपरी चालवत. पाच पैसे पानविडा होता. एका दिवशी दोनशे पान खपत. पानाच्या मोबदल्यात गावातून ज्वारी, गहू आदी गव्हाई मिळे. बेबाबाई शेतमजुरीला जात तेव्हा दोन्ही मुली, मुले पानटपरी चालवत. यावरच घरसंसार, दोन मुलींचे विवाह केले. लोटन व  योगेश या दोन मुलांचे शिक्षण केले. मुलांना कुठे कमी पडू दिले नाही. अगदी १०० रुपयाची घरातील ज्वारी विकली पण लहान्याला सहलीला पाठविले, अशी कहाणी आहे. आज मोठा ऑर्डनन्स फॅक्टरीत, तर लहान योगेश खासगी कंपनीत नोकरीला आहेत. गावी चांगले घर बांधले आहे. कुटुंब चांगले स्थिरस्थावर झाले आहे. मुलांना काडीमात्र व्यसन नाही. आईच्या कष्टाची जाणीव ठेवत तिला जपतात. याहून घरापेक्षा मंदिर दुसरे कोणते असू शकते?

बेबाबाईला माहेरची ओढ मुले आईला आपल्याकडे बोलावतात पण बेबाबाईला माहेरची ओढ स्वस्थ बसू देत नाही. लॉकडाऊनमुळे बंद असली तरी आजही त्या वयाच्या पंच्च्याहत्तरीत पानटपरी चालवतात. न घाबरता रात्री उशिरापर्यंत थांबून असता. पानविडा सध्या काहीसा मागे पडलाय म्हणून त्या जोडीने गोळ्या, बिस्कीट व कुरकुरे विकतात. गावातील कै.अभिमन पाटील, कोंडुरामजी, शिवराम दादा, हिराबाई पाटील यांनी त्यावेळेस चांगली साथ दिली, अशी माहेरच्या माणसांच्या मनाच्या श्रीमंतीचा त्या कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात.

                   लेकरांसाठी घेतलेल्या कष्टाला तोड नाहीमुलांच्या शिक्षणासाठी बेबाबाईने मोठ्या खस्ता खाल्ल्या. गावातील पिठाच्या गिरणीत खाली पडलेल्या पिठावर, ज्वारी-बाजरीचा घाटा, फागच्या पानांची भाजी, लाल अडगर ज्वारी यावर दिवस काढले. जात्यावर कुणाचे घरचे दळण कर, कांडण, धान्य सोय-साय कर, कुणाच्या शेतात गहू आदी शेतमालाचा सरा (शेतमाल काढून मागे शिल्लक राहिलेले) कर असा घरसंसार चालवला. एकूणच कहाणी ऐकून डोळ्यातून धारा लागतील, असे मुलांच्या भल्यासाठी तिने कष्ट उपसले.

   

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेBhadgaon भडगाव