शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

आई आणि आकाशवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:36 AM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात जळगाव येथील साहित्यिक किशोर कुलकर्णी यांनी आपल्या लेखनामागील सांगितलेली प्रेरणा.

माझ्या लेखन प्रेरणेचा खरा ऊर्जास्त्रोत माझी आई आणि आकाशवाणी आहे. माझी आई भारती कुळकर्णी माझ्या जन्माच्याही आधीपासून लेखन करत आली आहे. लेख, कथा, कविता, स्फूट लेखन ती लिहित असते. तिचा लेखनाचा गुण माझ्यात आला आहे. मला आठवतं, मी १९९० मध्ये अमळनेरच्या प्रताप कॉलेजला बीएच्या पहिल्या वर्षाला होतो. त्यावेळी कॉलेजमध्ये जळगाव आकाशवाणी केंद्राचे काही अधिकारी आले होते. त्यांनी युवा लेखक, कवींना आकाशवाणीच्या युववाणी कार्यक्रमासाठी लेखन करावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार मी त्याग ही लघुकथा लिहिली.लेखाची वा कथेची पहिली वाचक आईच असते. तिने माझी पहिली कथा वाचली. काही दुरुस्त्या सूचविल्या. विशेष महत्त्वाचं म्हणजे ही कथा मी आकाशवाणी या श्राव्य माध्यमासाठी लिहितो आहे, हे ध्यानात घेऊन ग्रंथ वा पुस्तकी भाषा तसंच बोलीभाषा यात खूप फरक असतो. आकाशवाणीच्या लेखनासाठी बोलीभाषेतून लेखन हवं, असं तिनं सांगितलं. मी संपूर्ण कथा बोलीभाषेतून लिहिली आणि ती युववाणीच्या ‘अक्षरवेल’साठी मंजूर झाली. नोव्हेंबर १९९० ला माझी पहिली कथा प्रसारीत झाली. माझी जन्मदात्री आणि आकाशवाणी माझी लेखन प्रेरणा म्हणता येईल. महाविद्यालयात असताना मिलिंद कुलकर्णी यांचे ‘लोकमत’मध्ये कॉलेजच्या बातम्या संकलन असलेलं ‘महाविद्यालयाच्या परिसरातून’ हे सदर चालवायचे. त्यात कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून मी अमळनेरच्या प्रताप कॉलेजच्या बातम्या पाठवित असे. तेव्हापासूनच लेखन माझ्या जीवनाचं अविभाज्य अंग बनलं. १९९५ ला नाशिकला पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकलो. उपसंपादक म्हणून काम करू लागलो. लेखन हेच माझं ब्रेड अ‍ॅण्ड बटर बनलं. नाशिकला असताना सुप्रसिद्ध साहित्यिक तात्यासाहेब वि.वा. शिरवाडकर, ज्येष्ठ साहित्यिक वसंतराव कानेटकर यांच्या संपर्कात आलो. त्यांच्याकडून शिकायला मिळाले. त्यांच्यासोबत जळगावचा प्रवास म्हणजे साहित्यिक मेजवानीच होती. जळगाव येथे १९९७ ला आल्यावर जळगावची पत्रकारिता अनुभवली. २००१ मध्ये जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागात संधी मिळाली. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या संपर्कात आलो. त्यांचे लेखन कौशल्य होतेच. आजची समाज रचना... हे पुस्तक त्यांचे प्रसिद्ध झाले होते. त्यांच्याशी लेखक म्हणूनदेखील अनेकदा चर्चा व्हायच्या. ज्यांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली अशा जोडप्यांची माहिती असलेलं अर्धशतकी लग्नगाठ वर्षभर चालविलं. त्याचं ‘अर्धशतकी लग्नगाठ’ हे पुस्तक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रेरणेने झालं. लेखक म्हणून बिरुदावली लागली. ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’, ‘घडावा सुंदर अक्षर’, ‘ज्ञानवाणी’, ‘पासवर्ड सुंदर अक्षराचा’ असे पाहता पाहता पाच पुस्तकं नावावर झाले. शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय घेऊन ‘ह्या जन्मावर’ चित्रपटाचं कथा व पटकथा लेखनही केलं. या कार्याचा मला आनंदच आहे.