शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा रक्कम, जळगांव विद्यापीठाचा सामंजस्य करार

By अमित महाबळ | Updated: July 4, 2024 18:50 IST

यामुळे विद्यार्थ्यांना शिकाऊ प्रशिक्षणाच्या काळात स्टायपंड हाती पडण्याची खात्री मिळणार आहे

अमित महाबळ, जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या अंतर्गत नव्याने सुरू झालेल्या बी. कॉम. (बीएफएसआय) या चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विद्यापीठ आणि बीएफएसआय सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शिकाऊ प्रशिक्षणाच्या काळात स्टायपंड हाती पडण्याची खात्री मिळणार आहे.

विद्यापीठाने बँका, वित्तीय संस्था तसेच विमा क्षेत्रात आवश्यक असणारी कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन या वर्षापासून विद्यापीठात बी.कॉम. (बीएफएसआय) हा चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अप्रेंटिसशिप एम्बेडेड पदवी कार्यक्रम असून शिक्षणाला व्यावहारिक कामाच्या अनुभवासह एकत्रित करणार आहेत. ज्यामध्ये विद्यार्थ्यांची कौशल्ये व रोजगार क्षमता वाढणार आहे. विद्यार्थ्यांना बँका, वित्तीय संस्था तसेच विमाक्षेत्र यामध्ये बीएफएसआय सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने अप्रेंटिसशिप प्राप्त होईल. त्यासाठी दिनांक ३ जुलै रोजी, विद्यापीठ आणि सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

बीएफएसआय क्षेत्रात रोजगारासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि मानवी संसाधने निर्माण करण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. यासाठी सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त होणार आहे.सामंजस्य करारावर स्वाक्षरी करतांना कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, बीएफएसआय सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य रंजन, नबरा चक्रवर्ती, प्रशाळेच्या संचालक प्रा. मधुलिका सोनवणे, प्रा. पवित्रा पाटील, प्रा. आर. आर. चव्हाण, प्रा. अतुल बारेकर, हर्षल नेरकर, अश्विनी मुंदडा आदी उपस्थित होते.

काय फायदा होणार?

सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना शिकाऊ म्हणून उद्योगात सहभागी होण्यासाठी सहाय्य केले जाईल, शिकाऊ उमेदवारांच्या मागणीचे एकत्रीकरण निश्चित करण्यासाठी उद्योग आणि विद्यापीठ यांच्यात परस्पर सहाकार्याने प्रशिक्षणार्थी सोर्सिंगची शाश्वत प्रणाली तयार केली जाईल. प्रशिक्षणार्थी कालावधी दरम्यान किमान निर्धारित मासिक स्टायपंड मिळण्याची खात्री असेल. अप्रेटींसशिप दरम्यान विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे सतत मूल्यमापन केले जाईल. विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र दिले जाईल. विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना कौशल्य अभ्यासक्रमासाठी ऑफलाईन / ऑनलाईन शिक्षण सामग्री उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावuniversityविद्यापीठ