आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२ - प्रचंड ऊन व उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना शनिवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. विजांचा चमचमाट व ढगांच्या गडगडाटासह वरुणराजाचे आगमन झाले. अर्धा तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शहर व परिसरात आनंदाचे वातावरण होते. दरम्यान, पावसाला सुरुवात होताच शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने महावितरणने शहरवासीयांच्या आनंदावर विरजन टाकले.मान्सूनपूर्व पावसाचे महाराष्ट्रातही दोन दिवसांपासून आगमन झाले आहे. शुक्रवारी राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली असताना, जळगाव जिल्ह्यातही रावेर,चाळीसगाव या ठिकाणी सरी बरसल्या. तर शनिवारी सायंकाळी जळगाव शहरासह परिसरातील शिरसोली, दापोरा, नशिराबाद या ठिकाणीदेखील रोहिण्या बरसल्या. जळगावात सायंकाळी सव्वा आठ ते पावणेनऊच्या दरम्यान, विजाच्या कडकडाटासह काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.शनिवारी दिवसभर प्रचंड उकाडा होता. सायंकाळी सहानंतर मात्र मंदगतीने वारे वाहत होते. सातनंतर मात्र वा-याचा जोर अधिकच वाढला. सुमारे तासभर जोराने वारे वाहत होेते. सव्वा आठला अचानक पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीचे पाच ते सात मिनिटे संथ गतीने पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जोराने वारा व विजांच्या कडकडाटासह सुमारे अर्धातास पाऊस झाला. यामुळे वातारणात गारवा निर्माण झाला होता.
जळगावात वादळी वाऱ्यासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 13:30 IST
प्रचंड ऊन व उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना शनिवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला.
जळगावात वादळी वाऱ्यासह पाऊस
ठळक मुद्देअर्धा तास रोहिण्या बरसल्याने आनंदपावसामुळे आला वातावरणात गारवाशहरातील अनेक भागातील वीज गायब