पाचोरा : पाणी पिण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी शहरातील संभाजीनगर भागात घडली.पोलीस सूत्रांनुसार, इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणारी मुलगी घरी एकटी होती. या दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या इसमाने या मुलीच्या दाराजवळ उभे राहून पिण्यासाठी पाणी मागितले. मुलगी घरात पाणी घेण्यासाठी गेली. तेव्हा घरात ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिचे तोंड दाबून छेडछाड करीत विनयभंग केला.यावेळी पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने सदर व्यक्ती पळून गेला. मात्र त्या नराधमाची ओळख पटून त्यास गाठले असता तो देशमुखवाडी भागातील रहिवासी ईश्वर दामू निकुंभ (वय ३५) असल्याचे निष्पन्न झाले. त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले.मुलीचे आईवडील बाहेरगावी गेले असता ही घटना घडली.रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
पाचोरा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:36 IST
पाणी पिण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी शहरातील संभाजीनगर भागात घडली.
पाचोरा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग
ठळक मुद्देपाणी मागण्याच्या निमित्ताने घरात केला प्रवेशमुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत केला विनयभंगआरडाओरड केल्यानंतर आरोपीने काढला पळओळख पटल्यानंतर घेतले ताब्यात