शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत तरुणाच्या डोक्यात घातली कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 12:35 IST

सहा जणांवर गुन्हा : जखमीला औरंगाबादकडे

जळगाव : किराणा दुकानावर उधारीने साहित्य देण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात गोविंदा गंगाराम गवळी (२८) या तरुणाच्या डोक्यात एकाने कुºहाडीने घाव घातल्याची घटना मोहाडी, ता.जळगाव येथे १६ रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून गोविंदा याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला शनिवारी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता गोविंदा गवळी हा तरुण कामावरुन घरी जात असताना मोहाडी गावात मराठी शाळेच्या समोर आतेभाऊ विजय गवळी याच्या किराणा दुकानावर गर्दी दिसली म्हणून तेथे गेला असता दुकानावर उधारीने किराणा साहित्य देण्याच्या कारणावरुन त्याच्याशी गावातील काही जण वाद घालत होते.हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असताना संतोष कोळी, विशाल कोळी, सागर कोळी, कृष्णा तायडे व गोपाल तायडे यांनी गोविंदा यालाच घेरुन लाथाबुक्यांनी मारहाण केली, त्याच वेळी शरद कोळी याने मागून येऊन गोविंदाच्या डोक्यात कुºहाडीने सपासप घाव घातले. यात गोविंदा याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होऊन बेशुध्द झाला.नातेवाईकांनी त्याला तातडीने शहरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने शनिवारी त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले.सर्व संशयित फरारया घटनेप्रकरणी गोविंदा गवळी याच्या जबाबावरुन संतोष कोळी, विशाल कोळी, सागर कोळी, कृष्णा तायडे, गोपाल तायडे व शरद कोळी यांच्याविरुध्द प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांच्याकडून हा तपास उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अद्याप कोणालाच अटक झालेली नाही, सर्व जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव