शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

मोहाडी येथील जि.प. शाळा डिजिटल करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून पाच एलईडी टीव्ही भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:01 IST

शाळा डीजिटल करण्याचा प्रयत्न आदर्श

जळगाव : आपली शाळा डिजिटल होऊन त्याचा गावातील विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या हेतूने मोहाडी (ता.जामनेर) येथील जिल्हा परिषदेच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल एक लाख ६७ हजार रुपयांची रक्कम जमा केली. माजी विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशविदेशात असलेल्या विद्यार्थ्यांनी देणगी देण्याचे जाहीर केले.मोहाडी येथील रहिवाशी व जळगावातील सुवर्ण पेढीचे जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील व सोयगाव येथे प्राथमिक शिक्षक असलेले किरण वसंत पाटील यांनी गावातील माजी विद्यार्थ्यांचा माझा गाव माझी शाळा मोहाडी या नावाचा गृप तयार केला. या गृपमध्ये स्थानिक शिक्षकांनाही सहभागी करण्यात आले.आज माजी विद्यार्थी नोकरी व्यवसायानिमित्त देश - विदेशात आहेत. गावातील जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करण्याची संकल्पना चर्चेतून पुढे आली. निधीचे सामूहिक आवाहन करण्यात आले. या संकल्पनेला साद देत ८० गृप सदस्यांनी १ लाख ६७ हजार रुपये निधी मनोहर पाटील यांच्या बँक खात्यात जमा केलेत. जमा रकमेतून शिक्षकांच्या मागणीनुसार ४३ इंची ५ स्मार्ट टीव्ही आणि उपयुक्त सामुग्रीची आॅनलाईन खरेदी करण्यात आली.जळगाव जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जामनेरचे तहसीलदार नामदेव टिळेकर, यजुर्वेंद्र महाजन व जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांच्याहस्ते हे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात शाळेच्या शिक्षकांना देण्यात आले. या प्रसंगी या योजनेत सहभागी झालेले शाळेचे देणगीदार माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचा उत्फुर्त सहभाग असलेल्या या योजनेत कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही हे विशेष. प्रत्येकाने गाव आणि आपली शाळा या विषयाला प्राधान्य देत स्वत:चा सहभाग नोंदविला.आपल्या गावातील शाळेला डिजिटलाईज करण्यासाठी मोहाडीतील ग्रामस्थांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. शाळेला केवळ संच भेट देवून न थांबता त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होईल याकडे लक्ष द्या. इतरही उपक्रम लोकांच्या सहभागात राबवा असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी येथे केले. उपस्थितांनीही मार्गदर्शन केले.जयप्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक तर प्रा.ए.टी.पाटील यांनी आभार व्यक्त केले. या प्रसंगी प्रा.डी.टी. बागुल, प्रा.प्रदीप बागुल, प्रा.सिताराम साळुंखे, किरण पाटील, संभाजी पाटील, डॉ.अर्जुन चौधरी, सुनील अहीर, मनोज पाटील, मारुती ठाकरे, पद्माकर गुजर, विठ्ठल बागुल, संजय पाटील, रविंद्र पाटील, मंगलसिंग राजपूत, अतुल पाटील, परमेश्वर पाटील, वसंत ठाकरे, बादशाह पाटील, मनोहर पाटील, मुख्याध्यापक प्रकाश कुमावत यांच्यासह शाळेचे संपूर्ण शिक्षक हजर होते.

टॅग्स :SchoolशाळाJalgaonजळगाव