शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा युवक कॉँग्रेसची आदर्श निवडणूक प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 12:50 IST

- चंद्रशेखर जोशीसंघटनात्मक निवडणुका म्हटल्या म्हणजे राजकीय पक्षांची डोकेदुखी. त्यातच गटबाजीचे ग्रहण हे प्रत्येक राजकीय पक्षात असतेच. त्यामुळे ज्याचे संघटनेवर व केंद्र राज्यातील संघटनेवर प्राबल्य त्याची सरशी हे ठरलेले. राजकीय संघटनांना विविध पदांवर नियुक्त्या देणे सोपे. कारण काही काळ वाद, टीका टिप्पणी झाली की सारे काही शांत होते. निवडणुकीची प्रक्रिया ...

- चंद्रशेखर जोशीसंघटनात्मक निवडणुका म्हटल्या म्हणजे राजकीय पक्षांची डोकेदुखी. त्यातच गटबाजीचे ग्रहण हे प्रत्येक राजकीय पक्षात असतेच. त्यामुळे ज्याचे संघटनेवर व केंद्र राज्यातील संघटनेवर प्राबल्य त्याची सरशी हे ठरलेले. राजकीय संघटनांना विविध पदांवर नियुक्त्या देणे सोपे. कारण काही काळ वाद, टीका टिप्पणी झाली की सारे काही शांत होते. निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यापेक्षा राजकीय पक्ष निवड करून मोकळे होणे याच पद्धतीचा अवलंब बऱ्याच वेळेस करत असतात. पण जेव्हा एखादा पक्ष आपल्या संघटनेत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करून त्याची प्रामाणिकपणे अमंलबजावणी करतो, ती एक आदर्श निवडणूक पद्धती ठरते. कॉँग्रेस पक्षावर विरोधक चहुबाजूंनी चुका करत असतात. सत्तेबाहेर असताना या पक्षाने नुकतीच एक निवडणूक प्रक्रिया राबविली. राज्यापासून तर जिल्हा पातळीपर्यंत यासाठी निरीक्षक नेमून निवडणूक घेतली. ही निवडणूक युवक कॉँग्रेस अंतर्गत झाली. नेहमीप्रमाणे अगोदर युवक सदस्यांची नोंदणी झाली, त्यांना सभासदत्व दिले गेले व नंतर तालुका अध्यक्षांपासून तर जिल्हाध्यक्षपदांची निवडणूक घेण्यात आली. जळगाव जिल्ह्यात युवक कॉँग्रेसची निवड प्रक्रिया नुकतीच झाली. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत प्रा. हितेश सुभाष पाटील यांनी कॉँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. ललिता पाटील यांचे चिरंजीव व जळगाव लोकसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष पराग पाटील यांचा अवघ्या ३० मतांनी पराभव केला. प्रा.पाटील यांना एकूण १०३८ मिळाली. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर फारसा प्रभाव प्रा. पाटील यांचा नाही. त्या तुलनेत त्यांचे प्रतिस्पर्धी पराग पाटील यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. असे असताना प्रा. हितेश पाटील यांनी कार्यपद्धती निश्चित करून निवडणूक लढविली. जिल्ह्यात युवकांचे जाळे निर्माण करून पक्षाचा विचार त्यांनी पोहोचविला व विजश्री मिळविली. पक्षाकडून एकदम निवड होऊन पदाधिकारी लादण्यापेक्षा निवडणूक प्रक्रिया राबवून निवड होणे हे केव्हाही योग्य. लोकशाही पद्धतीने होणारी ही निवड आदर्श तर आहेच पण युवकांनाही एक दिशा देणारी ही पद्धती म्हणावी लागेल. 

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव