शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

वेगवेगळ्या घटनेतील मोबाईल चोरटे ताब्यात, लोहमार्ग पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 3:53 PM

लोहमार्ग पोलीस सातत्याने प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांंवर लक्ष ठेवून आहेत. चोरट्यांवर कारवाई करीत असून वेगवेगळ्या घटनेतील मोबाईल चोरटे जेरबंद करण्यात आले आहेत.

भुसावळ : लोहमार्ग पोलीस सातत्याने प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांंवर लक्ष ठेवून आहेत. चोरट्यांवर कारवाई करीत असून वेगवेगळ्या घटनेतील मोबाईल चोरटे जेरबंद करण्यात आले आहेत.रेल्वे प्रवासात रेल्वे प्रवाशाचे लक्ष नसताना तसेच दरवाजाजवळ उभे असताना काठीने हातावर मारहाण करीत मोबाईल लांबवण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर गोपनीय माहितीनुसार, लोहमार्ग पोलिसांनी दोघा आरोपींच्या ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेले दोन मोबाईल जप्त केले आहेत. तसेच एका गुन्ह्यात जप्त मोबाईल न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराला परत देण्यात आला. दरम्यान, रेल्वेप्रवासात होणाºया चोºया पाहता लोहमार्ग पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.अप ११०५८ पठाणकोट एक्स्प्रेसने भुसावळ ते जळगाव प्रवास करीत असलेल्या नीलेश जगन्नाथ वाणी (संतोषी डेअरीजवळ, जळगाव) आऊटरजवळ गाडी आली असता आरोपी राहुल देवीदास तायडे (शेगाव, जि.बुलढाणा) याने हाताला काठी मारत ५८ हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवला होता. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तो तक्रारदार वाणी यांना नुकताच परत करण्यात आला.अहमदाबाद-यशवंतपूरच्या एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक चारमधील बर्थ क्रमांक ५६ वरून नंदुरबार ते जळगाव प्रवासी करीत असलेल्या अतुल रामदास बठेजा (आदर्श नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ) हे जळगाव येथे उतरत असताना चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवला होता. १४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी विनोद मोरेश्वर ईडी (४७, खालचे गाव, ब्रह्मटेक, बालाजी मंदिरामागे, शिरपूर, जि.धुळे) या आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नितीन न्हावकर, हवालदार नितीन पाटील, भरत शिरसाठ यांनी केली.भुसावळ रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकींग खिडकीवर तिकीट काढण्यासाठी तक्रारदार आशा प्रकाश रंभाळे (२५, धम्मदीपनगर, विश्वशांती बुद्धनगरजवळ, नागपूर) या ६ जानेवारी रोजी आल्या असता चोरट्यांनी त्यांचा १० हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी देवेंद्र खुशाल भगतकर (२१, गुप्ताचौक, नागपूर) यास नागपूर येथून अटक करण्यात आली व आरोपीच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मनीषा गजभिये, कॉन्स्टेबल आशू शेट्टीयार, कॉन्स्टेबल अमरदीप डोंगरे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ