शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला मोबाईल क्रमांक पाठविला : दोन गटात वाद उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 19:39 IST

चार जखमी : परस्परविरोधी गुन्हा दाखल, दुचाकीची तोडफोड

जळगाव : दुसऱ्याच्या हातून महिलेला मोबाईल क्रमांक पाठविल्याच्या कारणावरुन गुरुनानक नगरात शुक्रवारी रात्री दोन गटात वाद उफाळून आला. त्यात रॉडने मारहाण झाल्याने चार जण जखमी झाले. यावेळी दुचाकीचीही तोडफोड झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या ११ जणांविरुध्द शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मधुकर छोटू गोयर (५७ रा. गुरूनानक नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गल्लीतील मनोज रामसिंग चव्हाण यांच्याशी दोन महिन्यापूर्वी वाद झाला होता, तेव्हा पोलिसात तक्रारी झाल्या होत्या. मात्र हा वाद आपापसात मिटविला होता. १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता मधुकर गोयर हे मनोज चव्हाण यांच्या घरी गेले व तुमचा मुलगा आदर्श याने माझ्या सुनेला दुसऱ्याच्या हातून मोबाईल नंबर का दिला याचा जाब विचारला असता चव्हाण याची पत्नी अनिता चव्हाण यांनी मधुकर गोयर यांना शिवीगाळ व लोखंडी रॉडने मारहाण केली. यात गोयर हे जखमी झाले. वडीलांना मरत असल्याचे पाहून नितीन मधुकर गोयर आणि राकेश मधुकर गोयर भांडण सोडवत असतांना दोघांनाही बेदम मारहाण केली. मुधकर गोयर यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीसात मनोज रामसिंग चव्हाण, अनिता मनोज चव्हाण, आदर्श मनोज चव्हाण, मनोज चव्हाणची मोठी मुलगी (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. गुरूनानक नगर यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे करीत आहेत.दुसऱ्या फिर्यादीत अनिता मनोज चव्हाण (वय ४५ रा. गुरूनानक नगर) यांनी म्हटले आहे की, १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांचा मुलगा आदर्श याला राकेश मधुकर गोयर याने मारल्याचे घरी सांगितले. याचा जाब विचारण्यासाठी अनिता चव्हाण विचारण्यासाठी गेल्या असता त्यांना नितीन मुधकर गोयर येवून अनिता चव्हाण, आदर्श चव्हाण आणि त्यांच्या मुलींना शिवीगाळ करून मारहाण केली. यात पियुष मधुकर गोयर याने हातातील लोखंडी रॉडन घरासमोर लावलेले दुचीकी तोडफोड करून नुकसान केले. तसेच राकेश मधुकर गोयर याने हातात चाकू घेवून आदर्शवर वार करण्याच्या तयारीत असतांना अनिता यांनी अडविला व त्यात त्यांच्या हातावर वार झाले. त्यात त्या जखमी झाल्या. तसेच गोयर यांच्या घरीत सर्व सदस्यांनी मारहाण केली. अनिता चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात राकेश मधुकर गोयर, नितीन मधुकर गोयर, पियुष पंडीत गोयर, हेमंत पंडीत गोयर, सुनिल राजू सोनवाल, मधुकर छोटू गोयर, काजल नितीन गोयर, सुरेखा पंडीत गोयर अश्या आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक खेमराज परदेशी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव