शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

शहीद मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकासाठी आमदारांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:52 IST

हिंगोणे येथील गावात जावून आमदार हरिभाऊ जावळे यांनी केली जागेची पाहणी

ठळक मुद्देशहीदाच्या स्मारकासाठी आमदारांचा पुढाकारहिंगोणे ग्रामपंचायत घेतली अधिकारी व ग्रामस्थांची बैठकस्मारकाच्या जागेची केली नागरिकांसह पाहणी

आॅनलाईन लोकमतहिंगोणे,ता.यावल,दि.६ : २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्यातील शहीद व येथील रहिवासी मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्या स्मारकाची हिंगोणे गावात लवकरच उभारणी होणार आहे. त्यासाठी आमदार हरिभाऊ जावळे यांनी पुढाकार घेतला असून बुधवारी जागेची पाहणी केली.शहीद मुरलीधर चौधरी यांच्या ‘स्मारकाची नऊ वर्षानंतरही प्रतीक्षा’ असे वृत्त ‘लोकमत’ ने २६ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन आमदार हरीभाऊ जावळे यांनी ६ डिसेंबर रोजी येथे अधिकाºयांसोबत स्मारकाच्या जागेची पाहणी केली. तत्पूर्वी त्यांनी ग्रा.पं.कार्यालयात अधिकारी, पदाधिकारी यांची बैठक घेतली. यात त्यांनी शहीद मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकाची लवकरच उभारणी केली जाईल, असे सांगितले. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंत ब्रम्हनंद तायडे यांच्याशी चर्चा केली. स्मारकासाठी अंदाजपत्र तयार करुन ते वरिष्ठ स्तरावर पाठविण्याच्या सूचना केली. आमदार व अन्य निधीतून स्मारक उभारण्याचा त्यांनी निश्चय केला.आमदार जावळे यांनी ग्रामस्थांना स्मारकासाठी निधी गोळा करण्याची गरज नाही, असे सांगितले. स्मारकासाठीचा निधी उपलब्ध करुन देईल. पैशांचा विचार न करता स्मारकाच्या कामाला लागा. दोन महिन्यात स्मारक उभे करण्याचा त्यांनी व ग्रामस्थांनी संकल्प केला. प्रसंगी सरपंच नवलसिंग लोंढे, ग्रामविकास अधिकारी सी.आर.सपकाळे, सागर महाजन, भरत पाटील, बाळू कुरकुरे उपस्थित होते.

टॅग्स :BhusawalभुसावळMLAआमदार