शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

 आमदार, आयुक्त वर्कऑर्डर द्या, नाही तर राजीनामा द्या! मेहरुणमधील महिलांचा मनपात ठिय्या  

By सुनील पाटील | Updated: October 23, 2023 19:57 IST

मेहरुणमधील वॉर्ड क्र.१४ चा गट क्र.२५१ मधील रस्त्याच्या कामाच्या वर्कऑर्डरसाठी महिलांनी सोमवारी थेट महापालिकेत येऊन प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला.

जळगाव : मेहरुणमधील वॉर्ड क्र.१४ चा गट क्र.२५१ मधील रस्त्याच्या कामाच्या वर्कऑर्डरसाठी महिलांनी सोमवारी थेट महापालिकेत येऊन प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. आमदार महोदय उद‌्घाटन केले, पण कार्यादेश थांबले...राजीनामा द्या...आयुक्त मॅडम प्रशासक झालात, मग लोकांना वेठीस का धरतात..वर्कऑर्डर द्या नाही तर राजीनाम द्या असे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. दोन तासाच्या आंदोलन केल्यानंतरही आयुक्त न आल्याने महिला माघारी फिरल्या.

मेहरुणमधील गट क्र.२५१ मधील रस्त्याच्या कामासाठी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग अशा दोघांनी निविदा प्रक्रिया राबवली आहे. २०२२ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. बांधकाम विभागाच्या कामांना सहा महिन्यापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. शेजारील गट क्र.२५० मध्ये कामाची वर्कऑर्डर देण्यात आली, मात्र २५१ मधील कामाची वर्कऑर्डर आमदार सुरेश भोळे यांच्या दबावामुळे दिली जात नसल्याचा आरोप महिलांनी केला. मध्यंतरी आमदारांनी या कामाचे उदघाटनही केले होते.  याच कामावरुन भाजप व शिंदे गट समोरासमोर आले आहे. मक्तेदार सूरज नारखेडे यांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. आता सोमवारी महिलांनी वर्कऑर्डरसाठी महापालिकेत धडक दिली. साडे तीन ते साडे पाच असे दोन तास आंदोलन केले, मात्र आयुक्त कार्यालयात न आल्याने महिला माघारी फिरल्या. आमदार व आयुक्तांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव