जळगावातील विकास केवळ ठराविक भागातच होत असल्याचा आमदारांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:55 PM2017-09-23T12:55:15+5:302017-09-23T12:56:06+5:30

काही लोकांच्या मालमत्तांचे भाव वाढण्यासाठी ‘अमृत’चा वापर

MLA's allegation that Jalgaon development is happening only in certain areas | जळगावातील विकास केवळ ठराविक भागातच होत असल्याचा आमदारांचा आरोप

जळगावातील विकास केवळ ठराविक भागातच होत असल्याचा आमदारांचा आरोप

Next
ठळक मुद्देएक लाख विद्यार्थी गणवेशाविनाखोटेनगर, शिवाजी नगर भागात जनावरे राहतात का ? वाहनांच्या शोरुमसाठी 35 वर्षे जुने मंदिर तोडले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23 -  शहराचा विकास हा केवळ मेहरुण तलाव परिसर व मोहाडी रस्त्यापुरताच केला जात आहे.यामध्येकाही ठराविक लोकांचे षडयंत्र असल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण सभेत केला. तसेच महानगर पालिकेकडून अमृत योजनेबाबत घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये खासदार व आमदारांना बोलविण्यात येत नसल्याने खासदार ए.टी.पाटील व आमदार सुरेश भोळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत संबधित अधिका:यांवर कारवाई करण्याची मागणी केली. 
जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण समितीची बैठक  शुक्रवारी जिल्हा नियोजन भवनात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी खासदार ए.टी.पाटील हे होते. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उज्ज्वला पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह जिल्ह्यातील बहुतेक आमदार उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विभागातील योजना व कामांचा आढावा घेण्यात आला. 
20 कोटींच्या कामांची माहिती द्या अन्यथा मी सभागृह सोडतो 
महावितरणच्या कामांचा आढावा घेत असताना, जळगावात महावितरणकडून 20 कोटींची कामे सुरु आहेत. मात्र याबाबत महावितरणकडून खासदार किंवा आमदारांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिका:यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा मी सभागृह सोडतो असा इशारा आमदार सुरेश भोळे यांनी सभागृहात दिला. त्यानंतर संबधित अधिका:यांची चौकशी करण्याचे आदेश खासदार ए.टी.पाटील यांनी दिले. तसेच महावितरणच्या कारभारावर आमदार किशोर पाटील यांनी देखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. 
रेल्वे पुलांबाबत एकमेकांकडे बोट
जळगाव शहरातील शिवाजीनगर, पिंप्राळा व आसोदा रेल्वेपूल मंजूर असतानाही हालचाल नाही. रेल्वेगेट अधिक वेळ बंद राहत असल्याने तीन गंभीर रुग्णांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडला. यावर सार्वजनिक बांधकाम व रेल्वे विभागाच्या अधिका:यांनी एकमेकांकडे बोट दाखविले. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र दिल्यास आज सायंकाळ पयर्ंत पुढील प्रक्रिया राबवू असे रेल्वेच्या अधिका:यांनी                     सांगितले. यासह आमदार उन्मेश पाटील यांनी मॉडेल स्टेशनच्या सुविधाबाबत तक्रार केली. रेल्वेस्थानकावर अपंगासाठीची लिफ्ट एक्स्लेटरच्या सुविधा नसल्याचेही सांगण्यात आले.  
बनावट बिले देऊन अधिकारी मालामाल
भारनियमनाचा भाग वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात खंडीत होणार वीजपुरवठा, ट्रान्सफार्मर, कटआउटचा तुटवडा, यासह ग्रामीण पाणी योजनावरील बंद केलेला वीजपुरवठा यावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी अधिका:यांची बोलती बंद केली. विदर्भातील ठेकेदार आणून त्यांना बनावट बिले दिले जातात, यातून अधिकारी मालामाल होत असल्याची तक्रारही आमदार किशोर पाटील यांनी केली. 

शहरातील अतिक्रमणच्या नावाखाली प्रभारी आयुक्तांनी अजिंठा चौफुलीवरील 35 वर्षे जुने मंदिर केवळ वाहनांच्या शोरुमसाठी तोडले असल्याचा आरोप या बैठकीत केला. हे मंदिर तोडल्याने या ठिकाणच्या शोरुमला मोकळी जागा मिळाली असल्याचेही भोळे यांनी सांगितले.
ब:हाणपूर ते अंकलेश्वर रस्त्याचा आठवडय़ाभरात सव्र्हे
तरसोद-फागणे या रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे काम व  तरसोद ते चिखली हे काम ऑक्टोबरमध्ये सुरू करता येईल.  ब:हाणपूर ते अंकलेश्वर या रस्त्याच्या सव्र्हेचे काम पुढील आठवडयात सुरु करण्यात येईल तर पहूर- पाचोरा- भडगाव-चाळीसगाव- नांदगाव या रस्त्याचे काम एक महिन्यात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती  राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी बैठकीत दिली.
एक लाख विद्यार्थी गणवेशाविना - प्रा.चंद्रकांत सोनवणे
राज्य शासनाने यावर्षापासून विद्याथ्र्याचा खात्यावर गणवेशासाठी 400 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्या अनुदानासाठी विद्याथ्र्याचे आईचे शून्य बॅलेन्सवर खाते उघडणे गरजेचे आहे. मात्र राष्ट्रीयकृत बॅँका खाते उघडण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील सुमारे 1 लाखहून अधिक विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. 
 खासदारांनी केंद्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर अमृत योजनेत जळगाव शहराचा समावेश करण्यात आला. मात्र त्या योजनेच्या नियोजनासाठी खासदार किंवा आमदाराला बोलाविण्यात येत नसल्याची खंत खासदार ए.टी.पाटील यांनी व्यक्त केली. तर या योजनेसाठी केवळ शहरातील ठराविक भागांचाच विचार केल्या जात असून, खोटेनगर, शिवाजी नगर या भागात केवळ जनावरे राहतात का ? असा प्रश्न देखील आमदार भोळे यांनी उपस्थित केला. काही लोकांच्या मालमत्तांचे भाव कसे वाढतील असाच विचार सध्या अमृत योजनेच्या माध्यमातून केला जात असल्याचा आरोपही आमदार भोळे यांनी या सभेत केला.

Web Title: MLA's allegation that Jalgaon development is happening only in certain areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.