शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

 दूध दर घसरले! खडसेंच्या काळात तोट्यात गेलेला दूध संघ नफ्यात आल्याचा आमदार मंगेश चव्हाणांचा दावा

By विजय.सैतवाल | Updated: December 2, 2023 19:48 IST

दूध दराविषयी माहिती देण्यासाठी शनिवार, २ डिसेंबर रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

जळगाव : राज्यभरात पशुपालक शेतकऱ्यांना दुधाचे दर अत्यंत कमी मिळत असून, ते परवडणारे नसल्याने त्यांना भावातील फरक भरुन काढण्यासाठी अनुदान देण्याची मागणी राज्य शासनाकडे करणार आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन तथा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. दूध दराविषयी माहिती देण्यासाठी शनिवार, २ डिसेंबर रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत संचालक रोहित निकम, कार्यकारी संचालक शैलेश मोरखेडे उपस्थित होते. संपूर्ण राज्यातच नैसर्गिक परिस्थितीमुळे दुधाचे दर कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. जळगावात देखील शेतकऱ्यांना दूध संघ ३४.६० रुपये दर देत होता, आता हेच दर ३०.६० रुपये दिले जात आहे. हे दर परवडणरे नसल्याने दूध संघ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फरक म्हणून ५० पैसे देण्याच्या विचारात आहे. तसेच राज्यातील दुग्ध व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे देखील लिटरमागे २ रुपयांचे अनुदान देण्याची मागणी करणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. जळगाव जिल्हा दूध संघ शेतकऱ्यांना देत असलेले दर राज्यातील इतर मोठ्या दूध संघांपेक्षा जास्त असल्याचा दावा त्यांनी केला.

खडसेंच्या काळात तोटा, आता नफाराष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दूध संघातील कामावरून केलेल्या टीकेलाही आमदार चव्हाण यांनी उत्तर दिले. खडसे दूध संघात असताना आठ महिन्यांत सुमारे ९ कोटी ६० लाख रुपये तोटा झाला होता. तो भरण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून, आम्ही सत्तेत आल्यापासून दूध संघाला दर महिन्याला नफा झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

शेतकऱ्यांचा नव्हे खडसेंचाच आक्रोशएकनाथ खडसे यांनी जिल्हा बँक, दूध संघ तसेच गौण खनिज उत्खननात मोठा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. याकडे शासनाने दुर्लक्ष करावे यासाठी खडसेंनी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला. मात्र, त्यातला जो आक्रोश होता, शेतकऱ्यांच्या नव्हे तर यातून वाचण्यासाठी एकनाथ खडसेंचा होता, अशा खोचक शब्दात मंगेश चव्हाण यांनी खडसेंवर टीका केली.

लेखापरीक्षण अहवालात मोठा ठपकाएकनाथ खडसे यांच्या कार्यकाळात जिल्हा दूध संघात दूध, पावडर, लोणी यामध्ये गैरव्यवहार झाले. त्यांनी अनेकांची फसवणूक केली असून, त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. संगनमताने अपहार झाला असून, लेखापरीक्षणात मोठा ठपका ठेवण्यात आल्याचा दावा मंगेश चव्हाण यांनी केला.

टॅग्स :Jalgaonजळगावeknath khadseएकनाथ खडसे