अल्पवयीन मुलीवर बलात्कार
जिराळी : दोघ भावांना रात्री केली अटक
पारोळा : तालुक्यातील जिराळी येथील एका शिक्षकाने नात्याने मावस साली असलेल्या अल्पवयीन तरूणीवर सलग दोन वर्षे बलात्कार केला. या प्रकरणी दोघा सख्या भावांना पारोळा पोलिसांनी रात्री अटक केली. पिडीत मुलीला आई-वडील नसल्याने ती आपल्या मावस बहिणीकडे जिराळी येथे शिक्षणासाठी आली होती. मावस बहिण घरी नसतांना तिचा पती व जिराळी माध्यमिक विद्यालयात शिक्षक असलेला गौतम खैरनार (३५) हा पिडीत मुलीस त्रास देत असे. या प्रकरणी कोणला सांगू नको, अन्यथा तुझ्या बहिणी मेव्हण्याला ठार मारू अशी धमकी दिल्याचे पिडीत मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. दोन वर्षांपासून शाररिक संबंध ठेवल्याने ती पिडीत मुलगी गर्भवती राहिली. तिचा धुळे येथील खाजगी रूग्णालयात गर्भपात करण्यात आला. दरम्यान आरोपी हा पिडीत मुलीशी अश्लिल चाळे करीत असतांना त्याच्या भावाने ते बघितले होते. त्यानेही त्या पिडीत मुलीशी शाररिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. महिला असो.कडे धाव पिडीत मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचारा संदर्भात जळगाव जिल्हा महिला असोसिएशनकडे धाव घेतली. त्यांच्या पुढाकारातून एरंडोलच्या पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी हा गुन्हा नोंदवून घेतला. दोघांना घेतले ताब्यात पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहायक पोलीस निरीक्षक विलास कुळकर्णी, कॉन्स्टेबल संदीप पाटील यांचे पथक आज रात्री जिराळी येथे गेले. तेथुन भैय्या उर्फ शरद खैरनार(२६) याला ताब्यात घेतले. तर गौतम खैरनार याला अमळनेरातून ताब्यात घेतले. दोघांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गौतम खैरनार व शरद खैरनार यांच्याविरूद्ध भादंवि ३७६ (बलात्कार), ३५३ (विनयभंग), ५०९ (लैंगिकछळ)५०६,११४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास कुळकर्णी हे करीत आहे. (वार्ताहर)