शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच बैठकीत मंत्र्यांनी काढला अधिकाऱ्यांचा बाप; मंत्री संजय सावकारे यांचा संताप अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 13:34 IST

केंद्रात आणि राज्यात महायुतीचे शासन असताना खुद्द मंत्र्यांनी ‘टोल बंद’चा इशारा देण्याची भूमिका घेतल्याने अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार संजय सावकारे यांनी पहिल्याच बैठकीत ‘एनएचएआय’च्या (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) अधिकाऱ्यांचा ‘बाप’ काढल्याने अनेकांनी खासगीत नापसंती व्यक्त केली. याउपर महामार्गावरच्या अडचणी दूर न केल्यास नाक्यावर टोलही घेऊ देणार नाही, अशा शब्दात तंबीही दिली. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे शासन असताना खुद्द मंत्र्यांनी ‘टोल बंद’चा इशारा देण्याची भूमिका घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. 

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ‘दिशा’ची शनिवारी येथील जिल्हा नियोजन भवनात बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ यांच्यासह आमदार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महामार्गावरच्या अपूर्ण कामांच्या विषयांसाठी गतकाळात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या. त्यानंतर केलेल्या पाहणीत अपूर्ण कामे ‘जैसे थे’च दिसली. समस्या तशात असताना ‘टोल’ आकारणी सुरू केली. ते उचित नाही. म्हणून टोल बंद करू म्हणून भूमिका स्पष्ट केली आहे.-संजय सावकारे, वस्त्र उद्योगमंत्री.

टॅग्स :Jalgaonजळगावministerमंत्री