शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवड्यात जळगावातील ‘मेडिकल हब’चे भूमिपूजन - गिरीश महाजन 

By विजय.सैतवाल | Updated: March 12, 2023 17:52 IST

दोन आठवड्यात जळगावातील ‘मेडिकल हब’चे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. 

जळगाव : सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यासाठी घोषणा झालेल्या वैद्यकीय संकूल अर्थात ‘मेडिकल हब’साठी निविदा प्रक्रिया अखेर पूर्ण होऊन कार्यादेशदेखील देण्यात आले आहेत. येत्या दोन आठवड्यात या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणासह अत्याधुनिक रुग्णसेवा उपलब्ध व्हावी म्हणून एप्रिल २०१७मध्ये मोठा गाजावाजा करीत वैद्यकीय संकूल अर्थात ‘मेडिकल हब’ची घोषणा करण्यात आली होती. जळगाव ते औरंगाबाद रस्त्यावर जळगावपासून पाच कि.मी. अंतरावरील चिंचोली येथे हे मेडिकल हब उभारले जाणार आहे. या ठिकाणी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत चिकित्सा महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे राज्यातील पहिले शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे फिजिओथेरेपी महाविद्यालय प्रस्तावित आहे. अशा सर्व पॅथी एकाच ठिकाणी असलेल्या या मेडिकल हबचे काम कधी सुरू होणार, अशी सर्वांना प्रतीक्षा असल्याने यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. यासाठी तब्बल सहा वर्षे गेले असून त्यानंतर निविदा प्रक्रिया झाली व तसे कार्यादेश देण्यात आले आहेत. 

५००० कोटींचे कर्ज जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय संकुलासाठी निधीची कोणतीही कमतरता नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यासाठीच्या कामाचे कार्यादेश दिले गेले असून ७०० कोटी रुपयांचा निधीदेखील संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या सुविधा व सर्व पॅथी एकाच ठिकाणी असलेल्या या संकुलासाठी व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इतर ठिकाणच्या कामासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून पाच हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. त्या माध्यमातून गतीने कामे होणार असल्याचा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. 

केवळ भूमिपूजन होण्याची वेळचिंचोली परिसरात उभारण्यात येणाऱ्या या वैद्यकीय संकुलासाठी सर्व प्रक्रिया झाली असून येत्या दोन आठवड्यात त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे महाजन म्हणाले. केवळ भूमिपूजन होण्याची प्रतीक्षा आहे, त्यानंतर मोठ्या वेगाने हे काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आयुर्वेद महाविद्यालयासाठी ६०० कोटीदोन आठवड्यात वैद्यकीय संकुलाचे भूमिपूजन तर होणारच आहे, शिवाय लवकरच आयुर्वेद महाविद्यालयासाठीचीही निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. त्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :JalgaonजळगावGirish Mahajanगिरीश महाजन