शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जळगावात कारागृहातून सुटताच लांबविला लाखोचा कॅमेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 11:38 IST

‘सीसीटीव्ही’मुळे अट्टल चोरटा जाळ्यात

जळगाव : कॅमेरा चोरीच्या गुन्ह्यात कारागृृहातून सुटताच आणखी एक लाख रुपयांचा कॅमेरा लांबवून त्याची अवघ्या पाच हजारात विक्री करणाऱ्या चोरट्याच्या शहर पोलिसांनी शनिवारी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्याने त्याला ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करताना शहर पोलिसांनी शनिवारी पाळधी, ता.जामनेर गावाजवळ पकडला. अक्षय प्रकाश छाडेकर (२१, रा.पाळधी, ता.जामनेर) असे चोरट्याचे नाव आहे.ग्राहकांना दुकानात बसवून थोड्यावेळासाठी बाहेर गेलेल्या सतीश मार्तंड जगताप (रा.प्रभात चौक, जळगाव) यांचा एक लाख रुपये किमतीचा कॅमेरा नवी पेठेतील मार्तंड फोटो स्टुडीओतून लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती.दरम्यान, या आठवड्यात आणखी गणेश जोशी, चेतन अंभोरे यांचेही कॅमेरे चोरी झालेले आहेत. समाधान जगन सोनवणे या व्यावसायिकाची हार्ड डिस्क चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी जगताप यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल झाला.अक्षयवर आठ गुन्हेअक्षय छाडेकर याच्याविरुध्द चोरी व घरफोडीचे आठ गुन्हे दाखल आहे. गेल्या आठवड्यातच तो कॅमेºया चोरीच्या गुन्ह्यातून कारागृहातून जामीनावर सुटला होता. त्यानंतर लगेच त्याने जगताप यांचा कॅमेरा लांबविला. अक्षय याला जुगाराचे व्यसन आहे, त्यामुळेच तो चोºया करतो. त्याच्या परिवारातील इतर नातेवाईक सरकारी नोकरीला आहेत. जगताप यांचा कॅमेरा त्याने पहूर येथे पाच हजारात विक्री केला होता.‘सीसीटीव्ही’मुळे झाला निष्पन्नशहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, हेकॉ. विजयसिंग पाटील, प्रितम पाटील व रतन गीते यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या पथकाने शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अक्षय छाडेकर हा कॅमेरा चोरताना निष्पन्न झाला. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने या पथकाने पहूर, पाळधी व पाचोरा येथे त्याचा शोध घेतला. पाळधी गावाकडे येणाºया ट्रॅव्हल्स बसमध्ये चालकाच्या कॅबीनमध्येच तो बसलेला पोलिसांना आढळून आला. त्यांनी या बसचा पाठलाग करुन पाळधीजवळच त्याच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :Jalgaonजळगाव