शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानानंतरही नसबंदीला पुरुषांचा प्रतिसाद मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 22:25 IST

लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजनउपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची तरतूद करूनही तालुक्यात पुरुष नसबंदीला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे,

ठळक मुद्देजामनेर शहरासह तालुक्यातील चित्र५० महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

(सय्यद लियाकत/मोहन सारस्वत)जामनेर : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजनउपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची तरतूद करूनही तालुक्यात पुरुष नसबंदीला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे, तर दुसरीकडे ५० महिलांवर कुटुंंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी गैरसमजुतीने पुरुष नसबंदीसाठी धजावत नाहीत. पुरुषांची ही मानसिकता बदलून ते नसबंदीसाठी पुढे यावेत म्हणून शासनाने १ हजार ४०० रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आह.े कौटुंबिक व सामाजिक दबावातून म्हणावा तसा पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेस तालुक्यात प्रतिसाद मिळालेला नाही. वर्षभरात तालुक्यात एकाही पुरुषाने नसबंदीची शस्त्रक्रिया केली नाही, तर दुसरीकडे महिलांच्या शस्त्रक्रियेसाठी आरोग्य विभागाला २२०० शस्त्रक्रियेची उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र कोरोना महामारीमुळे आठ महिन्यामध्ये ५० महिला कुटुंंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी पुढे आल्या आहेत. शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना ६०० रुपयांपर्यंत शासनाकडून अनुदान दिले जाते. यामध्ये दारिद्र्य रेषेखालील, अनुसूचित जाती जमातीमधील महिलांना ६०० रुपये तर इतर महिलांना २५० रुपयांचे अनुदान देण्यात येते. आरोग्य विभागाच्या अहवालावरून वर्षभरात तालुक्यातील जामनेर उपजिल्हा रुग्णालय, पहूर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २२०० उद्दिष्टांपैकी आठ महिन्यात कोरोना माहामारीमुळे ५० महिलांवर उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे यांनी दिली.दरम्यान, खरे तर पुरुष नसबंदी ही चांगली व कमी वेळेत विना त्रास देणारी शस्त्रक्रिया आहे. याबाबत कोणताही गैरसमज मनात न ठेवता पुरूषांनी नसबंदीसाठी पुढे यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी नागरिकांना केले आहे.तीन वर्षात सात पुरुषांनी केली नसबंदीपुरुष नसबंदीबाबत समज-गैरसमजामुळे तालुक्यात गेल्या तीन वर्षात फक्त सात पुरुषांनी नसबंदी केली आहे. मात्र पुरुष नसबंदी या विषयाबाबत आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत. लोकशिक्षण करून ते गैरसमज दूर करावेत, असेही कुणाला वाटत नाही. पूर्वी तांबीबाबतही खूप जाहिरात होत असे. अगदी सरकारी बक्षिसेही दिली जात. मूल नको असेल तर तांबी बसवा, जेव्हा हवे असेल तेव्हा तांबी काढा, बाकी मुद्दे जनतेपर्यंत नीटपणे पोचवले जात नाहीत. पुरुष नसबंदीही अशीच साधीसोपी असावी, असा अनेकांचा समज करून दिला जातो. म्हणूनच याबाबतीतल्या सर्व उलटसुलट मुद्यांची जाणीव करून देणाऱ्या लोकशिक्षणाची गरज आहे.

टॅग्स :FamilyपरिवारJamnerजामनेर