शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

प्रदीपच्या लष्कराच्या आठवणी कुटुंबियांच्या स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:01 IST

जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खातमा करण्यासाठी लष्कराने राबविलेल्या ‘आॅपरेशन रक्षक’ मोहिमे दरम्यान अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात फेकरी (ता.भुसावळ) येथील जवान प्रदीप मनोहर पाटील २८ फेब्रुवारी २००३ रोजी शहीद झाला.

ठळक मुद्देकारगील विजय दिन विशेषअतिरेक्यांशी लढताना शहीद अन् फेकरी गाव उजेडात

सुमित निकम ।दीपनगर, ता.भुसावळ : जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खातमा करण्यासाठी लष्कराने राबविलेल्या ‘आॅपरेशन रक्षक’ मोहिमे दरम्यान अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात फेकरी (ता.भुसावळ) येथील जवान प्रदीप मनोहर पाटील २८ फेब्रुवारी २००३ रोजी शहीद झाला. यात फेकरी गावाचे नाव इतिहासात लिहिले गेल्याचे प्रदीपचे कुटुंब सांगतात. प्रदीप लष्कराच्या आठवणी सांगायच्या. त्या आजही स्मरणात असल्याचे त्याचे कुटुंबीय सांगतात.१९ जुलै १९९९ रोजी लष्करात दाखलभुसावळ शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या शेजारी वसलेल्या चार हजार लोकसंख्येच्या फेकरी या गावात २६ सप्टेंबर १९७८ रोजी प्रदीपचा जन्म झाला. १९ जुलै १९९९ रोजी प्रदीप भारतीय सैन्य दलात दाखल झाला. त्याची सैन्यदलात गनर या पदावर नियुक्ती झाली. या पदावर कार्यरत असतानाच अंगातील चपळाई व हजरजबाबीपणा, धाडसी प्रवृत्ती, निर्णय क्षमता गुणांच्या जोरावर राजस्थानमधील जैसलनेर सीमेवर नियुक्ती झाली. नंतर नाशिक येथे देवळाली कॅम्पमध्ये नियुक्ती झाली.प्रदीपचे कुटुंबीयप्रदीपचा मोठा भाऊ किरण पाटील हा वसईमध्ये खासगी कंपनीत अभियंता आहे. त्याचा लहान भाऊ सुधीर मनोहर पाटील हादेखील बडोदा येथे सैन्यदलात कार्यरत आहे. प्रदीपला शहीद होऊन आज १७ वर्षे पूर्ण होत आहे. त्याच्या कुटुंबियांची माहिती जाणून घेतली असता त्यांची स्थिती मध्यम आहे. मात्र उदरनिर्वाह व्यवस्थित सुरू असल्याचे त्याचे वडील मनोहर पाटील यांनी सांगितले.गावठाण जमीन मिळाली नाहीफेकरी ग्रामपंचायतीच्या वतीने आम्हाला जी गावठाण जमीन मिळायची होती ती मिळू शकली नाही. ग्रामपंचायतीत चक्कर गाठूनदेखील ‘आमच्याकडे गावठाण जमीन शिल्लकच नाही,’ असे वारंवार ग्राम पंचायतीकडून सांगण्यात आले, असे प्रदीपच्या वडिलांनी सांगितले.