शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

वरणगाव पालिकेची सभा ठरली वादळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:10 IST

सभेसमोर मंजुरी न घेता निविदा काढल्याच्या मुद्यावरून वरणगाव पालिकेची सभा गाजली.

ठळक मुद्देनगराध्यक्ष पडले एकाकीअनेक विषय बारगळलेचाळीसपैकी २२ विषय नामंजूर

वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : सभेसमोर मंजुरी न घेता निविदा काढल्याच्या मुद्यावरून वरणगाव पालिकेची सभा गाजली. यावेळी नगराध्यक्ष एकाकी पडल्याने सभेत गोंधळ उडाला. सभेच्या पटलावर अनेक विषयांवरील ठराव बारगळले. यावेळी विविध ४० विषयांपैकी २२ विषय नामंजूर झाले. येथील पालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. नगराध्यक्ष सुनील काळे अध्यक्षस्थानी होते.पालिकेच्या सभागृहात आयोजित या सभेला मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक राजेंद चौधरी, रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, विष्णू खोले, सुधाकर जावळे, बबलू माळी, गणेश धनगर, विकीन भंगाळे, विनोद चौधरी, नगरसेविका अरुणाबाई इंगळे, रोहीणी जावळे, जागृती बढे, मेहनाजबी पिंजारी, नरसीमबी कुरेशी, माला मेढे, प्रतिभा चौधरी, शशी कोलते, वैशाली देशमुख उपस्थित होते.यावेळी सभेच्या पटलावर ४० विषय ठेवण्यात आले होते. परंतु काही विषयांमध्ये सभेसमोर मंजुरी न घेता निविदा काढण्यात आल्या व कार्यारंंभ आदेश देण्यात आले. तसेच टिप्पणीमध्ये मुख्याधिकारी गोसावी यांनी या विषयाला मंजुरी द्यावी अशा प्रकारची टिपणी दिल्याने यावेळी सर्व नगरसेवक एका बाजूला तर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी एका बाजूला पडल्याचे निदर्शनास आले.सीसीटीव्ही कॅमेरे नगरपरिषदेत बसवणे, इंटरकॉम मशीन व वायरिंग इन्स्टॉलेशन नगरपरिषद संकेतस्थळ तयार करणे, स्वच्छ सर्वेक्षण २०२०च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करणे, स्वच्छ सर्वेक्षण अभियानांंतर्गत कापडी पिशव्या पुरवणे, नालेसफाई करणे, कंपोस्ट युनिट पुरवणे, प्रिन्सेस स्टिकर पुरवणे, सुशोभीकरणासाठी छत्र्या, कुलर खरेदी करणे, जीपीएस सिस्टीम बसवणे, वरणगाव रेल्वेस्टेशन कॉलनीला पाणीपुरवठा करणे, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मैला प्रक्रिया केंद्र बांधण्याबाबत ई टॉयलेट खरेदी करणे, पथदिवे नियंत्रण करणे, पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीला वॉटर एटीएमसाठी जागा देणे, शहरात महिला व पुरुषांना फायबर मुतारी खरेदी करणे यासह इतर विषय नामंजूर करण्यात आले. यामध्ये काही विषयांच्या कामांच्या निविदा काढून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. परंतु सभागृहाची मंजुरी न घेतल्याने या कामांना सभागृहाने मंजुरी दिली नाही.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ