पारोळा : येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेची बैठक झाली. यात पहिल्या दिवशी २४० प्रकरणांना मंजुरी मिळाली.वर्षभरापासून संजय गांधी निराधार योजनेची बैठक घेण्यात आली नव्हती. अखेर या बैठकीला महूर्त सापडला. योजनेचे अध्यक्ष रवींद्र भोमा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. पहिल्या दिवशी संजय गांधी निराधार योजनच्या ८०, तर श्रावणबाळ योजनेच्या १६० प्रकरणांची छाननी होऊन त्यांना समितीकडून मंजुरी देण्यात आली. २८ जून रोजी इंदिरा गांधी वयोवृद्ध योजनेच्या प्रकरणांची छाननी होणार आह, अशी माहिती समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली. यावेळी तहसीलदार अनिल गवांदे, नायब तहसीलदार एन. झेड. वंजारी, समिती सदस्य महेश पाटील, सुनिल पाटील, लक्ष्मण महाले, रावसाहेब गिरास, गोकुळ चौधरी, लिपिक गिरासे, एस.एस. पाटील, मुकुंद चौधरी, सचिन गुजराथी आदी उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजनेची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:31 IST