शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

चाळीसगावातील अतिक्रमण, रस्ते प्रश्नावर पालिकेची सभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:20 IST

पालिकेत कर्मचारी मनमानी करीत असल्याचा सत्ताधारी व विरोधकांचा आरोप

ठळक मुद्देमेहुणबारे जवळील पाणीपुरवठा योजना हस्तांतरीत करु नये. पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था म्हणून ती कायम ठेवावी यावर सभागृहाचे एकमत झाले. शहरात वर्दळीच्या ठिकाणी डिजिटल फलक काढतांना भेदभाव केला जातो. हा प्रकार चुकीचा असल्याचेही सभेत सांगण्यात आले.तुंबलेल्या गटारी, साचलेला कचरा यासह अस्वच्छतेबाबत आरोग्य विभागातील कर्मचारी उदासिन असल्याची तक्रार सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी केली. समस्या आरोग्य विभागाला कळवून देखील दखल घेतली जात नाही. कर्मचारी मनमानी करतात, असा आरोप सविता जाधव, आनंद खरात, रामचंद्र वेळोवेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न भावनिक केला जातो. या प्रश्नांची फाईल मध्यंतरी सापडली, असे सांगण्यात आले. तरीही पुतळा उभारला जात नाही. महाराजांचा पुतळा हा अस्मितेचा विषय असून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी विरोधक व सत्ताधाºयांनी एकजुटीने केल

चाळीसगाव, जि.जळगाव : शहरात अतिक्रमणाची समस्या दिवसागणिक गंभीर होत असून, त्याचे लांबत चाललेले शेपूट नदीपात्रापर्यंत पोहचले आहे. यावर अतिक्रमण विरोधी पथक काय करते, असा थेट प्रश्न करीत विरोधकांनी शनिवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह दणाणून सोडले. खरजई रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असतांना ठेकेदाराला पेमेंट का अदा करण्यात आले? या प्रश्नावरही चर्चेला तोंड फुटले. पालिकेत कर्मचारी मनमानी करीत असल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधकांनी केला.एकूण १९ विषयांबाबत नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा ११ वाजता सुरु झाली. शहर विकास आघाडीचे गटनेते राजीव देशमुख, भाजपाचे गटनेते राजेंद्र चौधरी, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर उपस्थित होते. उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, शिवसेनेचे नगरसेवक शामलाल कुमावत, शविआचे सूर्यकांत ठाकूर हे अनुपस्थित होते.सभेच्या सुरुवातीलाच मे महिन्यात काम झालेल्या दयानंद कॉर्नर ते खरजई नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत नगरसेविका रंजना सोनवणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. रस्त्यावर एका महिन्यात पहिल्याच पावसात खड्डे पडले. यासाठी ५५ लाख रुपये खर्ची पडले असतांना ठेकेदाराला कामाचा दर्जा न तपासताच काही रक्कम दिली गेली.यावरही शविआचे गटनेते राजीव देशमुख, सुरेश स्वार, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, आनंदा कोळी यांनी जोरदार आक्षेप घेतला.ठेकेदारास पुढील पेमेंट देऊ नये, अशी सुचनाही करण्यात आली.अतिक्रमणावर रोखशहरात सर्वत्र अतिक्रमण वाढत आहे. पालिकेने यासाठी अतिक्रमण विरोधी पथकाची निर्मितीही केली होती. मात्र तरीही आतिक्रमण होणे थांबलेले नाही. नदीपात्रात अवैध धंदे चालकांनी केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दाही चांगलाच गाजला.अतिक्रमण हे पावसाळ्यापूर्वी काढणे आवश्यक होते. परंतू यावर कार्यवाही झाली नाही. असा मुद्दा राजीव देशमुख यांनी उपस्थित केला.अतिक्रमण विरोधी मोहीम पावसाळ्यानंतर तीव्रपणे राबविण्यात येईल, असे नगराध्यक्षा आशालता चव्हाण व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सभागृहाला सांगितले.खासदार व आमदार निधीतून शहरात झालेली रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट झाली आहेत, असा आरोप विरोधकांनी केला. कापड मिल व रेल्वे बोगद्याखालील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ही जबाबदारी कोणाची, असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला. नदीपात्रातील मस्तानी अम्मा टेकडी परिसराचा पर्यटनांतर्गत विकास करावयाचा असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी. त्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागास ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे म्हणणे विरोधी गटाने मांडले.