जळगाव - मनपा स्थायी समितीच्या सभेचे आयोजन २० रोजी सकाळी ११ वाजता सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. या सभेत दैनिक बाजार शुल्क वसुली अहवालास मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याशिवाय स्थायी समितीतून आठ सदस्य निवृत्त होणार असल्याने त्याचा प्रस्ताव सादर केला आहे. बहिणाबाई उद्यानात शौचालय उभारणी करणे, प्रभाग क्रमांक १२ व १५ मधील विकासकामांसाठी होणाऱ्या खर्चास मान्यता देणे, या १२ विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जातील.
शहरात पावसाची हजेरी कायम
जळगाव - शहरासह जिल्ह्यात अनेक दिवसांपासून दररोज पावसाची हजेरी लागत असून, बुधवारी सायंकाळी ५ वाजेनंतर शहरात पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामावर मोठा परिणाम झाला. महापालिकेने पावसाचे काही दिवस काढून पुढील महिन्यातच कामांना सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात २० सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.