शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

वैद्यकीय क्षेत्रातील सेवा सर्वात मोठी- मुकेश अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:09 IST

गेल्या १५ वर्षांपासून जेसीस आणि रोटरी क्लब आॅफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे संस्थापक म्हणून काम करत असताना वैद्यकीय क्षेत्रात सर्वच ठिकाणी करण्यात आलेली सेवा ही जीवनातील सर्वात मोठी सेवा असून, यातून मिळणारा आनंद हा शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशा भावना मुकेश अग्रवाल यांनी व्यक्त केल्या आहेत.

ठळक मुद्देसेवेतून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो‘अपने लिये जिये तो क्या जिये, ये दिल जिये जमाने के लिए’ हे वडिलांचे ब्रीद घेऊनच समाज कार्य करण्याचे धोरण आजही कायमसंडे स्पेशल मुलाखत

उत्तम काळे ।भुसावळ, जि.जळगाव : गेल्या १५ वर्षांपासून जेसीस आणि रोटरी क्लब आॅफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे संस्थापक म्हणून काम करत असताना वैद्यकीय क्षेत्रात सर्वच ठिकाणी करण्यात आलेली सेवा ही जीवनातील सर्वात मोठी सेवा असून, यातून मिळणारा आनंद हा शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशा भावना मुकेश अग्रवाल यांनी व्यक्त केल्या आहेत.रोटरी आंतरराष्ट्रीय परिवारातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सामाजिक क्षेत्रातील ‘एव्हेन्यू आॅफ सर्विस सायटेशन’ हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर ‘लोकमत’शी ते बोलत होते.प्रश्न : कुटुंबात सेवेचा वारसा आहे का?उत्तर : १९९६ पूर्वी पुणे येथे शिक्षण घेतले. यानंतर भुसावळ येथे दाखल झालो व वडिलांनी चालवलेला सामाजिक क्षेत्रातील वारसा पुढे चालवण्याची संधी मिळाली. वडील वेदप्रकाश अग्रवाल हेही रोटरीचे सदस्य होते.प्रश्न : सेवेचे असे काही ठरवले होते का?उत्तर : वडिलांचे ब्रीदवाक्य होते ‘अपने लिये जिये तो, क्या जिये’ ‘ये दिल जिये जमाने के लिये’ हे ब्रीद घेऊनच समाज कार्यात काम करण्याचे निश्चित केलेले धोरण आजही कायम आहे.प्रश्न : बेवारस प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठीही पुढाकार असतो?उत्तर : रेल्वे स्थानकावरील बेवारस प्रेत असो, की रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना औषधोपचाराची गरज असो, आपण नेहमी या कामासाठी तत्पर राहिलो. हे सर्व करीत असताना रोटरी क्लब आॅफ भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभते.रुग्णसेवेला प्राधान्यलग्नसमारंभांपेक्षा आजारपणातील रुग्णांची सेवा करण्याला आपण विशेष महत्त्व देतो. शहरात प्रथम रोटरी क्लबच्या माध्यमातून शवपेटी आणली, तर तत्कालीन डीवाय.एसपी. रोहिदास पवार यांच्या कारकीर्दीमध्ये शहरात आठ ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेरेही लावले. अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध करून दिली, तर एक कोटी रुपये खर्च करून मॅमोग्राफी व्हॅन उपलब्ध केली आहे. ही व्हॅन सध्या अकोला येथे असून विदर्भात फिरत आहे. महिलांना कॅन्सरचा उपचार करण्यासाठी यांचा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. घरात कधीच वाढदिवस साजरा केला जात नाही. हा वाढदिवस आम्ही संकटात, दु:खात असलेल्या लोकांच्या सुख दु:खात सहभागी होऊन साजरा करतो, असे ते नमूद करतात.

टॅग्स :interviewमुलाखतBhusawalभुसावळ