शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

धगधगत्या काश्मीर खोऱ्यात महाराष्ट्रातील डॉक्टरांची रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:50 IST

१० दिवसात ४९०० जणांवर उपचार

जळगाव : जम्मू-काश्मीर सारख्या अतिसंवेदनशील, नेहमीच अतिरेकी हल्ले, गोळीबार, सतत दहशतीचे वातावरण, अतिरेकी कारवाया याची तमा न बाळगता तेथील जनतेचे आरोग्यात सुधारणा व्हावी आणि त्यांना आपलेसे करावे, या हेतूने जळगाव, नाशिक येथील डॉक्टरांनी काश्मीरमधील सीमारेषेवर १० दिवस मोफत आरोग्य सेवा केली. विशेष म्हणजे या आरोग्य शिबिराला भारतीय सैन्याने सुरक्षा देत सहकार्य केले. या आरोग्य शिबिरादरम्यान एकूण ४९०० रुग्णांनी लाभ घेतला.जळगावचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील, ऋषिकेश परमार (नाशिक), डॉ. विवेक जोशी (नाशिक), डॉ. अमोल कासार, (संगमनेर), डॉ.शोभना गायकवाड (संगमनेर), दिनार सावंत (नाशिक), डॉ.नैना खराडे (नाशिक), डॉ.मंगेश खिल्लारी (नाशिक), डॉ.सुनील जाधव (नाशिक), डॉ भाग्येश्री बागुल (नाशिक), डॉ. शैलेश गायकवाड (संगमनेर), डॉ.सविता कासार (संगमनेर) या डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता दर वर्षी प्रमाणे भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून काश्मीर खोºयातील कुपवाडा, लढाह सेक्टर, द्रुगमुल्ला सेक्टर, मच्चील सेक्टर, केरन सेक्टर, बहत्तरगाम सेक्टर, लुनहारे सेक्टर, राशनपोरा, क्रॉलपोरा सेक्टर या अतिसंवेदनशील भागात वैद्यकीय सेवा दिली.या आरोग्य शिबिरादरम्यान ४९०० रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आली. यासाठी भारतीय सैन्याने औषधींचा साठा उपलब्ध करून दिला. सोबतच डॉक्टरांच्या चमूने महाराष्ट्रातून बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्यावतीने ऋषिकेश परमार यांनी नाशिक येथून तर आर्या फाउंडेशनतर्फे डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी जळगाव येथून सोबत आणलेली सुमारे एक लाख रुपयांची औषधी रुग्णांना वितरित केली.डॉक्टरांच्या आरोग्य सेवेला या सैन्य अधिकाऱ्यांची साथ४१ आरआर मराठा बटालियनचे लेफ्टनंट कर्नल आकाश चिंचे, मेजर पुनीत कटारिया, कॅप्टन जसविंदर, कॅप्टन डॉ.संतोष, कॅप्टन रोशन, २४ आरआरचे ब्रिगेडियर जयंत कर, मेजर चॅटर्जी, ५ आरआर, ५६ आरआर, २४ आरआर, २८ आर्टीलरीच्या अधिकाºयांचे सहकार्य लाभले. या सोबतच भारतीय सैन्यदलातर्फे डॉक्टरांच्या निवास आणि भोजनाची सुविधा त्यांच्या सोबतच करण्यात आली. तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीदेखील घेतली गेली. शिबिराच्या ठिकाणी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एके ४७ सह जवान आणि प्रवासादरम्यान बुलेटप्रूफ वाहनसह एके ४७ हत्यारबंद जवानांसहीत असलेले दोन वाहन पुढे आणि दोन वाहन मागे अशा वाहनांच्या ताफ्यासह डॉक्टरांच्या चमुला नेण्यात येत असे. काश्मीर खोºयातील काही अतिसंवेदनशील भागात भीतीपोटी डॉक्टरदेखील जाण्यास घाबरतात. त्या भागातील गरजू रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित राहतात अशा ठिकाणी आरोग्य शिबिर असल्याने डॉक्टरांच्या या चमूला मोठ्या प्रमाणावर सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आली. विशेषत: केरण आणि मच्चील सेक्टर हा अतिसंवेदनशील परिसर असून या ठिकाणी कट्टर पंथीयांकडून डॉक्टरांच्या जीविताला धोका होता.काश्मीर खोºयातील ग्रामीण भागात भीतीपोटी आरोग्यसेवेचा अभाव असल्याने तेथील जनतेला आरोग्य सुविधा देण्यात आली. तेथील जनतेच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण करणे ही केवळ भारतीय सैनिकांचीच जबाबदारी नसून आपलीही जबाबदारी आहे, या हेतूने हे कार्य सुरू आहे.- डॉ.धर्मेंद्र पाटील, समन्वयक, बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन तथा अध्यक्ष, आर्या फाउंडेशन

टॅग्स :Jalgaonजळगाव