शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेकरुंसाठी सर्वच सरकारी रुग्णालयात मिळेल वैद्यकीय प्रमाणपत्र

By सुनील पाटील | Updated: April 22, 2023 13:08 IST

यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व रुग्णालयात ही सवलत उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे यात्रेकरुंना मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगाव : अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करताना यात्रेकरुंना आता जिल्हास्तराव येण्याची गरज नाही. जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व रुग्णालयात ही सवलत उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे यात्रेकरुंना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमरनाथ यात्रेदरम्यान अतिउंचावरील हवामानाच्या त्रासाने उद्भवणाऱ्या वैद्यकीय कारणांमुळे यात्रेकरूंचे जाणारे बळी थांबवण्यासाठी प्रत्येकाची वैद्यकिय तपासणी करुन शारीरीकदृष्ट्या सक्षम आहेत किंवा नाही यासाठी वैद्यकिय प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे.  आतापर्यंत यात्रेकरूंना नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून तपासणी करून ते प्रमाणपत्र देण्याची मुभा होती. परंतु काही यात्रेकरूंच्या बाबतीत खोटे प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रकारही समोर आले होते. त्यामुळे आता केवळ शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्रच ग्राह्य धरले जाणार आहे. हे प्रमाणपत्र जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये देण्याची व्यवस्था आहे.

अमरनाथ यात्रेकरुंचा त्रास कमी व्हावा, गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात तपासणीची सोय करण्यात आलेली आहे. यात्रेकरूची मधुमेह, फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार, दमा, रक्तस्त्रावासंबंधीचे आजार, मेंदूचे आजार, रक्तदाबाच्या तक्रारी अशा आजारांसाठी तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतरच वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. 

टॅग्स :JalgaonजळगावAmarnath Yatraअमरनाथ यात्रा