शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

भाजीपाला विक्रीत मापात पाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 01:06 IST

ग्राहकांची लूट : इलेक्ट्रॉनिक व प्रमाणित काटय़ांना खो : वजनमापे विभागाची बेफिकिरी

भुसावळ : इलेक्ट्रॉनिक व प्रमाणित वजनकाटय़ांना खो देत शहरातील भाजीबाजारात काही विक्रेत्यांनी मापात पाप सुरू केल्याची बाब लोकमतने रविवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाली आह़े रविवारच्या आठवडे बाजारात शेकडो विक्रेते शहर व तालुक्यातून येथे दाखल होत असले तरी काही विक्रेते मात्र वजनांऐवजी दगड-गोटय़ांचा वर्षानुवर्षे वापर करत असल्याची बाब दिसून आली. शिवाय एक किलो भाजीपाला घेतल्यानंतरही प्रत्यक्षात तो 800 ग्रॅमच भरत असल्याचेही दिसून आल़ेभाजीपाल्याच्या मापात पापजंक्शन शहरात दर रविवारी जामनेर रस्त्यावर आठवडे बाजार भरतो़ त्यासाठी जिल्हाभरातील विविध भागातून सुमारे हजारावर व्यावसायिक भाजीपाला विक्रीसाठी येतात़ इलेक्ट्रॉनिक काटे तर सोडा, पारंपरिक काटय़ांमध्ये दगड-गोटय़ांचाच वजन म्हणून वापर केला जात असल्याचे चित्र दिसून आल़ेप्रमाणित वजनकाटे वापरण्याचा नियम असतानाही शहरातील काही भाजीपाला व्यावसायिकांनी नियम धाब्यावर बसवले आहेत़ कारवाई करण्याची जबाबदारी वजनमापे निरीक्षकांची असली तरी त्यांची भूमिकाही आलबेल अशीच आह़े भुसावळात त्यांनी धडक कारवाई केल्याचे ऐकीवात नाही़ त्यांच्या बेफिकिरीने मात्र शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत आह़े4भुसावळात रविवारी भरणा:या आठवडे बाजाराचा विचार केल्यास किमान एक हजारावर भाजीपाला व्यावसायिक येतात़ त्यातील अनेक व्यावसायिकांकडे प्रमाणित वजनकाटे तर सोडा वजनेदेखील नाहीत़ 50 व शंभर ग्रॅमसाठी दगड-धोंडे वापरले जातात़ भाजीबाजारात येणारा ग्राहक कुठलीही भाजी घेताना कमालीची घासाघीस करतो़ भाजीपाला व्यावसायिक दोन पैसे पोटाला मिळावेत म्हणून व्यवसाय करतात. मात्र ग्राहकाला त्याच्या भावातच वस्तू हवी असल्याने नाइलाजापोटी व्यावसायिक काटा मारतात, तर भाव न करणा:या ग्राहकाला मात्र पूर्ण वजनाची भाजी मिळत़े भाजीपाला विक्रेत्यांकडे शॉप अॅक्ट नाही, कारवाई केलीच तर ते खरे नाव सांगत नाही, त्यामुळे न्यायालयात खटला उभा राहू शकत नाही, पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली, मात्र त्यांच्याकडून मनुष्यबळ नसल्याची अडचण पुढे केली जाते, असे वजन-मापे विभागाचे निरीक्षक  एच़एऩपवार म्हणाल़े शहरातील भाजीपाला विक्रेते वजन-माप विभागाकडून वजनांचे प्रमाणिकरण करीत असले तरी प्रत्यक्षात विक्री करताना प्रमाणित वजन वापरत नाही़़एका किलोमागे 200 ग्रॅमची घटदैनंदिन व्यापारात वजनकाटे कालबाह्य होऊन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे वापरले जात असले तरी आठवडे बाजारात मात्र अद्यापही पारपंरिक पद्धतीचे वजनकाटे वापरले जात आहेत. शिवाय प्रमाणित वजने वापरणे तर सोडाच, 50 व शंभर ग्रॅमच्या वजनासाठी थेट दगड-गोटेच वापरले जात असल्याने ग्राहकांची दिवसाढवळ्या लूट सुरू आह़े एक किलो भाजीपाला घेतल्यानंतर प्रमाणित वजनकाटय़ावर त्याचे वजन केल्यानंतर तो 800 ते 850 ग्रॅम भरत आह़े किलोमागे ग्राहकांना 150 ते 200 ग्रॅमचा फटका बसत आह़े एक प्रकारे ही ग्राहकांची लूट असल्याचे जाणकारांचे मत आह़ेवजनमापे विभागाची हास्यास्पद कारवाईवजनमापे विभागाची दरवर्षी 30 ते 40 भाजीपाला विक्रेत्यांवर होत असलेली कारवाई हास्यास्पद आह़े लूट थांबून प्रमाणित वजनकाटे वापरले जाण्यासाठी धडक कारवाईची अपेक्षा आह़े