शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महापौर-उपमहापौर निवडी वादात, तरीही प्रवेशद्वाराजवळ विजयाचे बॅनर झळकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 12:07 IST

गटनेते भगत बालानी यांनी देखील आक्षेप घेतला असून महापौर उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाइन घेण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देजळगाव महापालिकेत भाजप व शिवसेना-भाजप बंडखोर अशी लढत आहे. भाजपकडून प्रतिभा कापसे या महापौर तर सुरेश सोनवणे उप महापौर पदाचे उमेदवार आहेत.

जळगाव - महापालिका महापौर उपमहापौर निवडणुकीला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातीपासूनही ही निवड प्रकिया वादाचा मुद्दा ठरताना दिसत आहे.  महापौर-उपमहापौर यांच्या अर्जावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आल असून दोन्ही उमेदवारांचा सूचक अनुमोदक यांचे नाव राज पत्राचा नियमानुसार नसल्याचा दावा भाजपने केलाय. ऍड. शुचिता हाडा यांनी याबाबतचा आक्षेप घेत स्वाक्षरी मध्ये तफावत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 

गटनेते भगत बालानी यांनी देखील आक्षेप घेतला असून महापौर उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाइन घेण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच ही बेकायदेशीर प्रक्रिया असून, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यांचा आक्षेप फेटाळून लावला आहे. ऍडव्होकेट हाडा यांचा आक्षेप फेटाळण्यात आल्याने त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. 

जळगाव महापालिकेत भाजप व शिवसेना-भाजप बंडखोर अशी लढत आहे. भाजपकडून प्रतिभा कापसे या महापौर तर सुरेश सोनवणे उप महापौर पदाचे उमेदवार आहेत. शिवसेनेकडून जयश्री महाजन या महापौर तर भाजप बंडखोर कुलभूषण पाटील हे उप महापौर पदाचे उमेदवार आहेत. त्यासाठी, सध्या ऑनलाईन सभा होत आहे. सेना व भाजप बंडखोर हे ठाण्यात असून पत्रकारांना सभेत मनाई करण्यात आली आहे.

जयश्री महाजनांच्या अर्जाला भाजपकडून हरकत शहर मनपाच्या महापौर आणि उपमहापौर निवडीला प्रारंभ झाला असून उमेदवारांचे अर्ज वाचून दाखवले जात आहे. शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा अर्ज वाचून दाखविल्यानंतर सूचक आणि अनुमोदक असलेले नितीन लढ्ढा आणि प्रशांत नाईक यांचे नाव गॅझेटनुसार नसल्याचे सांगत भाजपच्या नगरसेविका ऍड.शुचिता हाडा यांनी त्यावर हरकत घेतली आहे. पिठासन अधिकाऱ्यांना हरकत नोंद करण्याचे त्यांनी सांगितले आहे.

निवडीपूर्वीच मनपाच्या प्रवेशद्वाराजवळ लागले विजयाचे बॅनर

मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया सभागृहात सुरू असून निवड होण्यापूर्वीच शिवसेनेच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचे फलक लावले आहे. मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शिवसेना कार्यकर्ते विराज कावडिया यांनी जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांच्या निवडीचे फलक लावले आहे. भगवा फडकला अशा शब्दात असलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मतदान प्रक्रिया थांबवण्याची मागणीभाजपच्या अनेक नगरसेविका यांना ऑनलाईन सभेतून लेफ्ट करण्यात आल्याने, मतदान प्रक्रिया थांबवण्याची मागणी भाजपचा सदस्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकMayorमहापौर