शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅथ्स शॉर्ट ट्रिक्स’द्वारे होणार गणिताशी गट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:08 IST

जळगाव - गणित म्हटले की अनेक विद्यार्थ्यांच्या कपाळावर आढ्या पडतात. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर आकडे फिरू लागतात. यामुळे केवळ पास ...

जळगाव- गणित म्हटले की अनेक विद्यार्थ्यांच्या कपाळावर आढ्या पडतात. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर आकडे फिरू लागतात. यामुळे केवळ पास होण्याइतपत अभ्यास करावा आणि गणिताचा विषय संपवावा, अशी अनेकांची भावना असते. मात्र, गणिताशी गट्टी व्हावी, आणि सोप्या पध्दतीने गणित सोडविता यावे, या उद्देशाने शहरातील अविनाश किरण जावळे या शिक्षकाने ‘मॅथ्स शॉर्ट ट्रिक्स' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांची गणिताची भीती कायमची दूर होऊन त्यांना गणित आवडू लागले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे़केवळ पास होण्याइतपत गणिताचा अभ्यास करावा आणि विषय संपवावा, अशा अनेकांच्या भावना असते़ मात्र, गणिताला रंजक पद्धतीने जर मांडले तर तो सोपा होऊ शकतो. या हेतूने पाळधी येथील आर्यन इंटरनॅशनल स्कूलचे उपमुख्याध्यापक असलेले अविनाश जावळे यांनी लॉकडाऊन काळात मॅथ्स शॉर्ट ट्रिक्स हे पुस्तक लिहिले आहे.जावळे हे नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून त्या माध्यमातून ते गत दोन वर्षांपासून गरीब, गरजू मुलांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग चालवत आहे. या वर्गाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता आधुनिक शिक्षणाचे धडे देत आहेत. या पुस्तकात जावळे यांनी गणित विषयामधील अवघड वाटणारे गणितीय उदाहरण सोडवण्यासाठी सोप्या पद्धतीची मांडणी केली आहे.गरजू मुलांच्या नावे पुस्तकात ट्रिक्सदरम्यान, वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवताना एका विद्यार्थ्याने पुस्तकामधील लेखकाप्रमाणे आमचेही नाव पुस्तकात यावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार जावळे यांनी विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहिण्याचे ठरवले. मॅथ्स शॉर्ट ट्रिक्स पद्धतीत प्रामुख्याने दोन अंकी नंबरपासून ते सहा अंकी नंबरपर्यंतचे गुणाकार दोन मिनिटात सोडवणे, दोन अंकी नंबरचे वर्ग सोप्या पद्धतीने काढणे, १-१०० पर्यंतचे पाढे सोप्या पद्धतीने लिहिणे व पाठ करणे आदींचा अवलंब केला आहे. या पुस्तकासाठी त्यांना वडील किरण जावळे, प्रभुदास जावळे, प्रल्हाद जावळे, प्रमोद जावळे, गीता जावळे, सतीश जावळे, धीरज जावळे यांचे सहकार्य लाभले आहे.

 

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव