शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

माथेफिरुचे कृत्य ; कार, दुचाकी जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 11:48 IST

जळगाव : माजी आमदार गुरुमुख जगवाणी व राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या निवासस्थानाच्या परिसरातच दोन कार ...

जळगाव : माजी आमदार गुरुमुख जगवाणी व राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या निवासस्थानाच्या परिसरातच दोन कार व दोन दुचाकी असे चार वाहने मध्यरात्री जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहने जाळणारा संशयित कैद झालेला आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंद नगर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या घटनेत अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या बंगल्याच्या मागे रामदास कॉलनीत राहणारे नीरज सुरेशचंद्र छाजेड (३७) यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच १९ बी.झेड ६१८८) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पेट्रोल टाकून जाळण्यात आली, त्यात दुचाकी खाक झाली असून बाजूलाच लावलेली दुचाकी(क्र.एम.एच १९ ए.झेड १२३७) देखील आगीने अर्धवट जळाली. ही घटना अपार्टमेंटमध्ये राहणाºया वॉचमनच्या लक्षात आल्याने त्याने आरडाओरड केली. तातडीने पाणी टाकून ही आग विझविण्यात आली.दुसºया घटनेत माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवानी यांच्या बंगल्याच्या बाजूला राहणारे सुभोद मोतीचंद बुद्देलखंडी (५१,रा.रामदास कॉलनी) यांची कार (क्र.एम.एच १९ बी.यू ७७४४) अपार्टमेंटच्या बाहेर लावली होती. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास याच अज्ञात व्यक्तीने कार पेटवून दिली. आगीचे प्रमाण मोठे असल्याने अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते.तिसºया घटनेत गणपतीनगरातील शालिमार अपार्टमेंटमध्ये राहणारे गिरीष बंन्सीलाल मोतीरामाणी (३६) यांचे नातेवाईक भारत तलरेजा रा. सिंधी कॉलनी यांनी आपली कार (क्र.एम.एच १९ सी.यू ५५१५) लॉकडाऊनमुळे तेथे लावली होती. मध्यरात्री १.४३ वाजेच्या अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकले व पेटवून दिल्याचा प्रयत्न केला.सीसीटीव्ही कॅमेºयात आग लावल्यापासून ते आग विझविण्यापर्यंत सर्व घटना कैद झाली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल आहे.पहिला प्रयत्न असफल; दुसऱ्यांदा पेटविली कारदरम्यान, या घटनेत संशयिताने कार पेटविली, मात्र त्यात त्याला अपयश आले. कारने पेट न घेतल्याने तो पुन्हा कारजवळ आला व कार पेटवून मुख्य गेटवरुन पळाला. बन्सीलाल मोतीरामाणी यांच्या घराच्या बाजूला राहणारे करण पोपली हे कुलरमध्ये पाणी टाकण्यासाठी उठले तेव्हा कार पेटविल्याचे लक्षात आल्याने आरडाओरड केली. अपार्टमेंटमध्ये राहणाºया नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात पाणी घेवून कारला लागलेली आग काही मिनीटात विझाविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव