शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

थोर गुरू परंपरा असणारा  मातंग समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 17:16 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘बारा बलुतेदार’ या सदरात लिहिताहेत अ‍ॅड.माधव भोकरीकर...

सकल जगताला आपल्या भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाने दीपवून टाकणाऱ्या, भगवान श्रीकृष्णाचे गुरू कोण? हा प्रश्न आपल्यापैकी कोणाला पडत नसेल. त्यावेळी गुरुगृही जायचे, ते गुरुची ज्ञानसाधना किती आहे हे पाहून, हीच आपली संस्कृती आणि परंपरा आहे. उज्जैनी वनात एक सांदीपनी नावाचे ऋषी परिवारासह राहत असत. चार वेद ग्रहण केलेले, पचविलेले, अहंकारविरहित असे हे ऋषी. अरण्यात शिंदीच्या झाडावरील पनाळ्या ते आपल्या मंत्रोच्चाराने झाडावर न चढता तोडत असत. त्यामुळे त्यांचे नाव शिंदीपाल पडले होते.भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे थोरले बंधू बलराम तसेच त्यांचा मित्र सुदामा यांना सांदीपनी ऋषीकडून अनुग्रह प्राप्त झाला आहे. ते त्यांचे गुरू आहेत ही भावना. श्रीकृष्ण, बलराम, सुदामा हे सांदीपनी ऋषीकडे आश्रमात चौसष्ट दिवस होते. या काळात त्यांनी सर्व विद्या आपल्या गुरूंकडून अवगत केल्या. 'तुला रे भगवंता काय शिकवायचे?' असे म्हणणारे सांदीपनी ऋषी, हे आपले गुरुचे कर्तव्य मात्र चोख बजावत होते.दक्षिणेत मंदिरेशिवशक्तीच्या दहावा अवतारापैकी नववा अवतार, शंकर पार्वतीने मातंग-मातंगी म्हणून घेतला. मातंगी महादेवाची कश्ती असून सर्व देवदेवताची वरदायिनी आहे. मातंगी देवीला संतती व संपती राखणारी देवी म्हणून पुजले जाते. दक्षिण भारतात मातंगीस मांगम्मा असेही म्हणतात. तिरुपती बालाजी, चेन्नई येथे देवीची मंदिरे आहेत. आंध्र, गुजरात, तामिळनाडू या प्रांतामध्ये मातंगी मंदिरे आहेत. महालक्ष्मी तुळजापूरची देवी ही मातंगाचीच आई आहे, ही भावना आहे.जो तो आपल्या कर्माने श्रेष्ठ अथवा कनिष्ठआपल्या कोणाच्याही मनात जातींबद्दलच्या श्रेष्ठत्वाबद्दल अथवा कनिष्ठतेबद्दल प्रश्न निर्माण झाले किंवा केले गेले, तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे, 'परमेश्वराने कोणालाही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ म्हणून जन्माला घातले नाही. जो तो आपल्या कर्माने 'श्रेष्ठ अथवा कनिष्ठ' होतो आणि ठरतो. आपल्याला श्रेष्ठ व्हायचे का कनिष्ठ व्हायचे, हे आपण आपलेच ठरवावे आणि त्याप्रमाणे आपले कर्म करावे.' आपले वाडवडील चिरंतन सत्य सांगून गेले आहेत की, ऋषींचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये.सुरुवातीला अत्यंत छोटी, क्षुद्र वाटणारी व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने अत्यंत श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचते. त्यावेळी तिचे पूर्वीचे, जन्मजात असलेले लघू रूप आपल्याला विसरावे लागते, ते तिच्या कर्तृत्वाने! आपल्या समाजाचा एक भाग असलेला, प्राचीन गुरुकुलाची परंपरा असलेला, हा मातंग समाज, या अवस्थेत का, कसा आणि कोणामुळे, कोणत्या चुकीमुळे आला, याचा विचार केवळ त्याच समाजाने नाही, तर आपण सर्वांनीच करायला हवा. ती कारणे समजली म्हणजे आपल्या कर्तृत्वाला पायबंद कशामुळे बसू शकतो, आपली प्रगतीची घसरण का होते हे आपल्याला समजू शकेल; त्यावर उपाययोजना करता येईल. समाजाची जशी गरज असते, त्यानुसार समाज ती गरज भागवत असतो. बारा बलुतेदार आणि बारा अलुतेदार, हा त्याचाच परिपाक! समाजाचा गाडा सुरळीत चालावा यासाठी जी विविध कर्तव्ये तत्कालीन समाजधुरिणांनी नेमून दिली, त्यांच्या व्यवसायावरून व कर्तव्यावरून, ही गेल्या काही काळात दिसत असलेली जातीव्यवस्था निर्माण झाली. आज याचे पूर्वीइतके स्वरूप उरले नाही, हे आपल्या शिक्षणाने, समजुतीने!गावाचे रक्षण करणाºया जमातीतील जी मंडळी होती, त्यातील हा 'मातंग समाज'! हिंदू धर्मातील मूळचा रांगडा, आक्रमक, प्रामाणिक असलेला हा समाज, गावचा संरक्षणकर्ता होता.गावाचे संरक्षण करायचे तर स्वाभाविकपणे, गावात शिरण्याच्या वाटेवर यांचा पहारा तथा वस्ती असायची. यांच्यातील परंपरेने आलेला हा गुण शिवाजी महाराजांनी ओळखला, म्हणून त्यांच्या काळात त्यांनी काही ठिकाणी गडांचे, घरांचे, चौक्यांचे पहारे ताठ किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी, ही या समाजाकडे सोपविली होती. महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या शिलेदाराची घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाºया मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले, बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यात यांचा उल्लेख आढळतो.स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी त्यांना अडचणीच्या ठरलेल्या लोकांना, समाजाला वैयक्तिकपणे अथवा सामूहिकपणे कोणत्यातरी मार्गाने त्रास देण्याची योजना केली होती. त्यात त्यांनी रामोशी, मातंग अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरविले. त्यांना गावातून तडीपार केले.त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले. तेव्हा या समाजातील लोकांनी इंग्रजांच्या विरोधात गावागावातून संघर्ष केला. या समाजातील उस्ताद लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीत अनेक क्रांतीकारकांना आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण दिले होते. अनेक शूरवीर या तालमीतून तयार झाले होते. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके हे यांच्याच तालमीतले! (पूर्वार्ध)-अ‍ॅड.माधव भोकरीकर

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव