शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

कुºहे येथे शहीद राकेश शिंदे यांचा गावकऱ्यांना अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:29 IST

सन १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात कुºहे (पानाचे) येथील भारतमातेचे सुपुत्र राकेश शिंदे यांनी मातृभूमीचे रक्षण करताना बाजी लावली आणि शत्रूला परतावून लावण्यात आपले योगदान दिले.

ठळक मुद्देकारगील विजय दिनयुध्दातील विजयात दिले होते योगदानकुºहे पानाचे येथे मंदिर, तर भुसावळात स्मारक

उत्तम काळे ।भुसावळ, जि.जळगाव : सन १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात कुºहे (पानाचे) येथील भारतमातेचे सुपुत्र राकेश शिंदे यांनी मातृभूमीचे रक्षण करताना बाजी लावली आणि शत्रूला परतावून लावण्यात आपले योगदान दिले. युद्धात विजयी ठरलेला हा योद्धा सीमा रक्षक म्हणून काश्मीर येथील कुंज येथे सेवा बजावत असतानाच २७ फेब्रुवारी २००० रोजी शहीद झाला. मात्र या शूरवीराच्या स्मृती गावकऱ्यांनी मंदिराच्या रुपाने जतन करून ठेवल्या आहेत आणि आजही त्या मंदिरात गावकरी शहीद राकेश शिंदे यांना सन्मानाने अभिवादन करतात.शहीद राकेश शिंदे यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले होते. तरीही आई आणि मोठे भाऊ सुरेश उर्फ अण्णा शिंदे यांच्यासह इतर दोन भाऊ मोलमजुरी करून घराचा गाडा ओढत होते. राकेश यांना शिक्षण देऊन मोठे करू, असा आशावाद आईला व मोठ्या भावांना होता. घरची परिस्थिती बघून राकेशनेही बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा निश्चय केला.१९९५ साली १७ मराठा बटालियनमध्ये सैनिक म्हणून ते भरती झाले. आणि मोठ्या हिंमतीने कारगील युध्दात त्यांनी कर्तव्य बजावले.अंगाला यायचे शहारेराकेश सीमेवर घडत असलेल्या घटनांचे सुट्यांमध्ये घरी आल्यानंतर वर्णन करायचे त्यावेळी सर्वांच्या अंगावर शहारे येत, असे आई अनुसयाबाई शिंदे सांगतात. एकदा तर बंदुकीच्या गोळ्या दोन्ही पायातून गेल्याची आठवण त्यांनी सांगितली. ती आजही स्मरणात असल्याचे त्या नमूद करतात.भुसावळात आहे स्मारकराकेश शहीद झाल्यानंतर भुसावळचे माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी यांनी, २००१ साली तत्कालीन नगराध्यक्ष रेखा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नाहाटा चौफुलीजवळ त्यांचे स्मारक उभारले. हे स्मारक आजही कुºहे (पानाचे) गावासह परिसरातील तरुणांना प्रेरणा देते.शेतामध्ये बांधले मंदिरकुºहे (पानाचे) येथे त्यांच्या मालकीच्या शेतात शहीद राकेश शिंदे यांच्या स्मृतीत मंदिर उभारण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी दरवर्षी या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम होतो. त्याला ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर असतात.पेट्रोलपंपाचा प्रस्ताव रखडलेलाचकेंद्र सरकारने शहीद जवानाच्या परिवाराला किंवा वारसाला पेट्रोलपंप देण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी शहीद राकेश यांच्या आईच्या नावाने पेट्रोलपंपाचा प्रस्ताव पाठवला. मात्र जन्मतारखेचा दाखला मिळाला नाही. त्यामुळे अद्यापही प्रस्ताव रखडलेला आहे, अशी खंत अनुसयाबाई शिंदे यांनी व्यक्त केली.