शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा येथे विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले, चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 18:58 IST

इंदिरा नगरातील शिक्षक पत्नी सृष्टी स्वप्नील साळुंखे या विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली.

ठळक मुद्देपाचोरा येथील घटनापतीसह चौघांना अटक

पाचोरा, जि.जळगाव : शहरातील इंदिरा नगरातील शिक्षक पत्नी सृष्टी स्वप्नील साळुंखे (वय २६) या विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू-सासरे व नणंद यांना २२ रोजी अटक केली. या विवाहितेने २१ रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.सूत्रांनुसार, इंदिरानगर भागात भाडेकरू म्हणून राहत असलेल्या एका खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षक स्वप्नील वनराज साळुंखे यांच्या पत्नी सृष्टी स्वप्नील साळुंखे हिने २१ रोजी आपल्या लहान मुलासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी विवाहितेच्या आई ललिताबाई सतीश पाटील (रा.पिळोदा, ता.शिरपूर, जि.धुळे, ह.मु.बडोदा) यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिली की, ‘मुलगी वैशाली उर्फ सृष्टी हिला सासरची मंडळी ही लग्न झाल्यापासून वारंवार छळ करीत होती. लग्नात तुझ्या माहेरच्यांकडून हुंडा कमी मिळाला आहे. त्यामुळे माहेरून पाच ते सहा लाख रुपये घेऊन ये, अशी वारंवार मागणी करून तिला त्रास द्यायचे. पती स्वप्नील वनराज साळुंखे हे तिला मारठोक करून शारीरिक व मानसिक छळ करत होते. याबाबत मुलीने वारंवार फोनवर व प्रत्यक्ष परिस्थिती मला सांगितली होती. मात्र ही परिस्थिती सुधारत नसल्याचे पाहून व यास कंटाळून मुलीने स्वत:ला जीवन जगण्याची इच्छा नाही, असे पाहून आत्महत्या केली आहे.’या प्रकरणी पती स्वप्नील वनराज साळुंखे, सासरा वनराज चिंधा साळुंखे, सासू शोभाबाई साळुंखे व नणंद हर्षदा उदय भदाणे यांच्याविरुद्ध मुलीस शारीरिक मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPachoraपाचोरा