शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Gudi Padwa 2018 : जळगाव येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत, शोभायात्रा, पथसंचलन व गावगुढीचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 13:08 IST

विविध संस्थांतर्फे भरगच्च कार्यक्रम

ठळक मुद्देराष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संचलनसंस्कार भारतीतर्फे पाडवा पहाट

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १८ - मराठी नववर्ष तथा गुढीपाडव्यानिमित्त रविवार, १८ रोजी शहरातील विविध संघटना तसेच संस्थांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शोभायात्रा, गुढी पूजन, महेश चौक प्रवेशद्वाराचे लोकार्पण, महिलांचा सत्कार, पथसंचलन मोटरसायकल रॅली इत्यादी कार्यक्रम उत्साहात पार पडले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संचलनगुढी पाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरात विविध ठिकाणी पथसंचलन करण्यात आले.महेश चौक प्रवेशद्वाराचे आज लोकार्पणजळगाव जिल्हा माहेश्वरी सभातर्फे गुढी पाडव्यानिमित्त रविवारी सकाळी ९ वाजता महेश चौक प्रवेशद्वाराचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी आमदार स्मिता वाघ, महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, माजी महापौर नितीन लढ्ढा, कृउबा चेअरमन लक्ष्मण पाटील, अ‍ॅड. सुरेंद्र काबरा, बाळकृष्ण बेहडे, मधूर भट्टड आदी उपस्थित होते. समाजाच्या सहभागातून सुशोभीकरण केलेल्या महेश चौकात भव्य गुढी उभारून पूजन करण्यात आले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्रीराम मंदिर संस्थानतर्फे शोभायात्राश्रीराम मंदिर संस्थानातर्फे गादीपती हभप मंगश महाराज यांच्या नेतृत्वाखाली १८ ते २६ मार्च दरम्यान श्रीरामनवमी महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्याच्या दिवशी या सोहळ्यास सुरूवात झाली. असून पहाटे ४ वाजता काकड आरती, महाभिषेक तसेच गरूड ध्वजस्तंभारोपण, त्यानंतर सकाळी ७ वाजता महाआरती होऊन ७़३० वाजता नववर्ष स्वागत यात्रा निघाली. रथचौकात गावगुढीपूजन, त्यानंतर महाआरती आणि भजन-कीर्तन झाले.संस्कार भारतीतर्फे पाडवा पहाटभारतीय नववर्षाच्या प्रारंभी संस्कार भारतीतर्फे रविवारी सकाळी मनपाच्या १७ मजली वास्तूच्या प्रांगणात ‘पाडवा पहाट’ हा कार्यक्रम सादर झाला. प्रसन्न पहाटे व वृक्षराजीने नटलेल्या आणि गार, आल्हाददायक वातावरणात, निळ्या आकाशात विहार करणाऱ्या विविध पक्षी समूहांच्या साक्षीने ही ‘पाडवा पहाट’ उत्साहात झाली. यामध्ये विविध गीत सादर करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.भारत विकास परिषदकडून शोभायात्रेचे स्वागतहिंदू नववर्षानिमित्त श्रीराम मंदिर संस्थानतर्फे सकाळी गायत्री मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. भारत विकास परिषदतर्फे घाणेकर चौकात स्वागत करण्यात आले. 

टॅग्स :JalgaonजळगावGudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८