शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण लोकसभा, विधानसभेत सुटणारा विषय नाही - गिरीश महाजन 

By सुनील पाटील | Updated: September 2, 2023 18:24 IST

आरक्षण घालवल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली.

जळगाव : मराठा आरक्षण देण्यासाठी खूप तांत्रिक बाजू आहेत. लोकसभा किंवा विधानसभेत सुटणारा हा विषय राहिलेला नाही. सर्व बाजू समजून घेऊन तोडगा काढू. आम्ही उच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवले, मात्र मागच्या अडीच वर्षात लक्ष दिलं गेले नाही. त्यामुळे हे आरक्षण घालवल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली.

जालन्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मागील चार,पाच दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते. त्यांनी पाणी देखील घेतलं नव्हतं, त्यामुळे त्यांची प्रकृती खराब होत चालली होती. रास्त मागणीसाठी एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ नये सरकार म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. म्हणूनच पोलीस त्यांना घ्यायला गेले होते. मात्र त्या ठिकाणी दगडफेक झाली. जनतेचा रोष इतका होता की त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. परंतु तो इतका बेछुटपणे केला की त्याचे समर्थन कोणी करु शकत नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही यावर बोलले आहेत. मुलांसा शाळेत जायचं आहे. महिलांना प्रवास करायचा आहे. त्यामुळे एस.टी.बसेसची जाळपोळ व सरकारी मालमत्तेचे नुकसान करु नये असे आवाहन महाजन यांनी केले. या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे.

उध्दव ठाकरेंच्या काळात अनेक घटनाउद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात अशा अनेक घटना घडल्या, मात्र त्यांनी त्यांची साधी विचारपूस केली नाही किंवा राजीनामा दिला नाही. कोरोनात लोक मरत असताना ठाकरे घराच्या बाहेर निघाले नाहीत. विरोधक आता त्या गावी जाऊन पुतणा मावशीचं प्रेम दाखवत असल्याची टिका मंत्री गिरीश महाजन यांनी केली. नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार ही अफवा आहे. असा कुठलाही विषय नसल्याचे महाजन म्हणाले.

टॅग्स :JalgaonजळगावGirish Mahajanगिरीश महाजन