शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मन्यार कुटुंबाला उद्योगाला शासकीय मदतीसाठी उचलली पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 15:00 IST

पारंपरिक लाखेच्या बांगड्यांचा उद्योग अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करताच या वृत्ताला पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी संवेदनशील प्रतिसाद देत स्वत: मन्यार कुटुंबाची तातडीने भेट घेऊन उद्योगासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या भावनिक हाकेला प्रांताधिकाऱ्यांचा संवेदनशील प्रतिसादउद्योगाचे मालक निसार सलामू मन्यार आणि त्यांचा मुलगा मोहम्मद अली यांना बोलविले कार्यालयातउद्योगात येणाºया अडचणींची एक तास घेतली माहिती

महेश कौंडिण्यपाचोरा, जि.जळगाव : ‘लोकमतने ३० जानेवारी रोजी 'तेरा बंदा बस बिखरा है...अभी तक टूटा नही..' या शीर्षकाखाली येथील मन्यार कुटुंबाचा पारंपरिक लाखेच्या बांगड्यांचा उद्योग अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करताच या वृत्ताला पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी संवेदनशील प्रतिसाद देत स्वत: मन्यार कुटुंबाची तातडीने ३१ रोजी कार्यालयात भेट घेऊन उद्योगासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.गेल्या शंभर वर्षांपासून पारंपरिक लाखेच्या बांगड्या बनवण्याचा पारंपरिक उद्योग करणाºया मन्यार कुटुंबाचा आणि या उद्योगाचादेखील अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. त्याबद्दल सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रांताधिकारी कचरे यांनी संवेदनशीलतेचे दर्शन घडवत स्वत: ‘लोकमत’शी संपर्क करून उद्योगाचे मालक निसार सलामू मन्यार आणि त्यांचा मुलगा मोहम्मद अली यांना आपल्या कार्यालयात भेटून आस्थेने त्यांची व त्यांच्या उद्योगात येणाºया अडचणींची एक तास माहिती घेतली.नियमानुसार त्यांना स्टार्ट अप, मुद्रा लोन, ओबीसी महामंडळामार्फत मिळणारी आर्थिक मदत किंवा इतर शासकीय योजनांमधून काही मदत देता येईल का याची माहितीदेखील त्यांनी तातडीने घेतली. याशिवाय या कुटुंबासाठी उद्योग आधार तयार व्हावेत म्हणून त्यांनी तातडीने संबंधितांना सूचना दिल्या असून, शासकीय मदतीसाठीची पावलं आजच उचलली गेली आहेत.प्रांताधिकारी कचरे या उद्योगाला प्रत्यक्ष भेट देणार असून त्यांनी या कुटुंबाने इतक्या वर्षांची परंपरा जोपासत हा उद्योग सुरू ठेवल्याबद्दल त्यांचे कौतुकदेखील केले. प्रत्यक्ष प्रांताधिकाऱ्यांनी इतक्या आस्थेने चौकशी केल्यामुळे मन्यार कुटुंबाला उज्ज्वल यशाचा एक आशेचा किरण दिसू लागला आहे. ‘लोकमत’ने नामशेष होऊ पाहणाºया या उद्योगाची घेतल्याबद्दल ‘लोकमत’चे ऋण व्यक्त केले.

टॅग्स :SocialसामाजिकPachoraपाचोरा