शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दहावीच्या परीक्षेला अनेक केंद्रांवर सर्रास कॉपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 12:33 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष

ठळक मुद्देकॉपीमुक्त अभियानाचा दावा फोल मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून अर्ध्या तासात प्रश्नपत्रिका फोडल्या जात आहेत

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ९ - माध्यमिक शालांत विभागाकडून सुरु असलेल्या दहावीच्या परीक्षेदरम्यान गुरुवारी इंग्रजीच्या पेपरला अनेक परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी सुरु असल्याचे चित्र पहायला मिळाले. पेपर सुरु झाल्यानंतर अनेक केंद्रांवर पहिल्या मिनिटापासून तर पेपर संपेपर्यंत वर्गांमध्ये सर्रास कॉपी सुरु होती. त्यामुळे शिक्षण विभाग व पोलीस प्रशासनाकडून कॉपी मुक्त अभियानाचे कितीही दावे केले असले तरी ते फोल ठरत असल्याचे दिसून आले.पोलीस बंदोबस्त असतानाही कॉपीदहावीच्या परीक्षेदरम्यान गुरुवारी ११ ते २ या वेळेत इंग्रजीचा पेपर झाला. शहरातील बºयाच परीक्षा केंद्रांवर तरुण शाळांच्या उंच भिंतीवर चढून आपला जीव धोक्यात घालून कॉपी पुरवित होते. काही ठिकाणी सुरुवातीला पोलिसांनी कॉपी पुरविणाºयांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही जणांनी पोलिसांचा बंदोबस्त भेदून कॉपी पुरविणाºयांनी विद्यार्थ्यांपर्यंत कॉपी पोहचवल्या. विशेष म्हणजे वर्गांमधील काही पर्यवेक्षकांकडून कॉपी करणाºया विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करता शांततेत पेपर लिहण्याचा अजब सल्ला दिला जात होता.नूतन मराठा महाविद्यालय, विद्यानिकेतन शाळेच्या परिसरात परीक्षा सुरु असताना कॉप्यांचा खच पडलेला दिसून आला. या कॉप्यांचा हुशार विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी नाराजीही व्यक्त केली.पोलिसांनी घेतला सावलीचा आधारपरीक्षा कें द्रावर कॉपी सारखे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस व होमगार्डच्या कर्मचा-यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, हा बंदोबस्त    केवळ नावापुरताच असल्याचे दिसून आले. परीक्षा सुरु झाल्यानंतर पोलिसांनी परीक्षा केंद्राच्या परिसरातील सावलीचा आधार घेत खुर्चीवर आराम केला. दरम्यान, ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने परीक्षा केंद्रावर सुुरु असलेल्या गैरप्रकाराचे फोटो घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर सावलीचा आधार घेतलेल्या पोलिसांनी तरुणांचा पाठलाग करीत कारवाईचे नाटक केले.या केंद्रावर सुरु होती कॉपी...‘लोकमत’च्या चमूने शहरातील नूतन मराठा महाविद्यालय, अ‍ॅँग्लो उर्दू हायस्कूल, जि.प.विद्यानिकेतन शाळा, मॉडर्न गर्ल्स स्कूल, का.ऊ.कोल्हे विद्यालयातील परीक्षा केंद्रांची पाहणी केली. या ठिकाणी कॉपी सुरु असल्याचे दिसून आले.पेपर सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासात प्रश्नपत्रिका बाहेरगेल्या काही वर्षांपासून मोबाईलचा वापर वाढल्यामुळे परीक्षेदरम्यान पेपर सुरु झाल्यानंतर मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून अर्ध्या तासात प्रश्नपत्रिका फोडल्या जात आहेत. हेच चित्र गुरुवारी इंग्रजीच्या पेपर दरम्यान पहायला मिळाले. कॉपी पुरविणा-या अनेक युवकांच्या मोबाईलवर प्रश्न पत्रिकेचे फोटो होते. त्यावरुन उत्तरे शोधून उत्तराच्या प्रत झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आल्या.परीक्षेदरम्यान परीक्षा कें द्राच्या शंभर मिटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, शहरातील बºयाच परीक्षा केंद्राच्या शंभर मिटर आतच्या परिसरात झेरॉक्सची दुकाने सुरु होती.

टॅग्स :Jalgaonजळगावexamपरीक्षा