शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: मोदी यांनी दहशतवादाविरूद्धचे धोरण जगासमोर ठेवले- राजनाथ सिंह
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

मानराज पार्कनजीक खडीच्या डंपरची कारला धडक

By admin | Updated: January 20, 2017 00:41 IST

अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प : नायगाव येथील कुटुंब बचावले

जळगाव : ट्रेलरच्या धडकेत डॉक्टरपूत्राचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता ओव्हरटेक करणा:या कारवर खडी वाहतूक करणारा डंपर आदळला. यात चालकाच्या प्रसंगावधानामुळे कार पलटी होता होता बचावली, त्यामुळे कारमधील चौघे बालंबाल बचावले. हा अपघात म्हणजे कारमधील चौघांसाठी ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असाच होता. मानराज पार्कजवळ हा अपघात झाला.शिव कॉलनीजवळ 16 जानेवारी रोजी द्रौपदी नगरातील डॉ.पी.के.पाटील यांच्या कुंदन या एकुलत्या मुलाचा ट्रेलरच्या अपघातात मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी याच परिसरात पुन्हा हा अपघात झाला. नायगाव येथील सुधीर अरुण पाटील या तरुणाची प}ी कोमल जळगाव शहरातील दवाखान्यात प्रसुत झाली आहे. त्यामुळे सुधीरसह अमोल रमेश पाटील, शोभाबाई गोपाळ            पाटील व वत्सलाबाई युवराज पाटील हे गुजराल पेट्रोलपंपाजवळ राहणा:या नातेवाईकांकडे आले              होते. सकाळी तेथून जेवणाचा डबा घेवून हे चौघे जण कारने (क्र.एम.एच.19.सी.एफ.3160) दवाखान्यात जात असताना पुढे चालणा:या खडी भरलेल्या डंपर (क्र.एम.एच.19 ङोड 2703)ला चालक सुधीर याने मानराज पार्कसमोर ओव्हरटेक केला. डंपरचावेग वाढल्याने तो थेट कारवर आदळला. डंपर चालकाने पळ काढला. अनिल सोनवणे यांच्या मालकीच्या दादाश्री कन्स्ट्रक्शनचा हा डंपर होता.20 ते 25 फुटार्पयत कारला डंपरने ओढत नेले. विरुध्द दिशेने कार फिरल्याने रस्त्याला लागून असलेल्या उतारवर चालकाने नियंत्रण मिळवले. त्यामुळे कार पलटी होता होता वाचली, अन्यथा कार पलटी होवून मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातात कारचा डाव्या बाजूचा पत्रा कापला गेला आहे. सुदैवाने कारमधील कोणालाच दुखापत झाली नाही.पुण्य आडवे आले..हा अपघात म्हणजे ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ असाच होता. परमेश्वराची कृपा म्हणून आम्ही सर्व जण बचावलो अशी प्रतिक्रीया व्यक्त करत सुधीर पाटील या चालकाने ‘लोकमत’ जवळ आपबिती कथन केली. आम्ही व कुटूंबाने केलेले पुण्य आडवे आले व परमेश्वराने वेळीच सावरण्याची शक्ती दिली..अन्यथा आज अनर्थ झाला असता, असेही सुधीर म्हणाला.