वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : मॉर्निंग वॉकला जाणाºया महिलेच्या गळ्यातून आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी धूमस्टाईल लांबविल्याची घटना शनिवारी पहाटे पाचला घडली.सूत्रांनुसार, वरणगाव शहरातील मच्छिंद्रनगर भागात राहणाºया सपना रमेश बोंडे या महिला बोदवड रस्त्यावरून नागेश्वर मंदिराच्या दिशेने मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या. पुढे वाटेत महात्मा गांधी विद्यालयाजवळ दुचाकीवर दोन जण त्यांच्यासमोर आले. आम्हाला दीपनगरला जायचे आहे, ते कोणत्या दिशेला आहे, हे ते विचारत होते. विचारत असतानाच काही कळण्याच्या आत दुचाकीवरील चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढले आणि ते दुचाकीवरच वेगाने पसार झाले.सतत वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना पहाटे घडली. यामुळे सकाळीस फिरायला निघणाºया महिलांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. अशा भुरट्या चोरांचा बदोबस्त करण्याची मागणी महिलांकडून होत आहेयाबाबत अद्याप पोलिसात नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 16:05 IST
मॉर्निंग वॉकला जाणाºया महिलेच्या गळ्यातून आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी धूमस्टाईल लांबविल्याची घटना शनिवारी पहाटे पाचला घडली.
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबविले
ठळक मुद्देवरणगाव शहरातील पहाटेची घटनाआठ ग्रॅम वजनाचे होते मंगळसूत्ररस्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातून ओढले मंगळसूत्रमहिलेला काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी केले पलायन