शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:52 IST

ज्ञानाद्वारे आमच्या जीवनात बदल घडावा आणि स्वत:ला त्यासाठी पात्र बनवायला हवे. सामाजिक रूपातही जरी आपण दिसायला मानवी पुतळ्यासारखे मानव ...

ज्ञानाद्वारे आमच्या जीवनात बदल घडावा आणि स्वत:ला त्यासाठी पात्र बनवायला हवे. सामाजिक रूपातही जरी आपण दिसायला मानवी पुतळ्यासारखे मानव आहोत. आगपेटीच्या खूप काड्या असतील तर त्यापासून आपण काय काय करू शकतो, एका काडीने आपण दिवा लावू शकतो आणि त्याच काडीने आपण घरही जाळू शकतो. दिसायला त्यात सगळ्या काड्याच आहेत, पण कार्य काय करत आहोत? फरक पडतो तो हेतूचा. आपण सर्वांनी स्वत:ला मानवी गुणांनी युक्त करायचे आहे. कोणासाठीही कसलाही विपरीत असा विचार बाळगायचा नाही. जात-पात पहायची नाही. सर्वांना या परमात्म्यानेच बनवले आहे. आपल्यासारखाच समोरच्याचाही आदर करायला शिकलो पाहिजे. याठिकाणी सेवेच्या मैदानातही किंवा कुठेही पदांशी जोडले जायचे नाही. आपण स्वत:ला दासभावनेत ठेवायचे आहे. आमच्या मनाचा जो भाव आहे तो दासभावच असायला हवा. यावर एका शायराने असेही म्हटले आहे की,गली में मकान थे। मकानों पे नाम थे ।नाम के साथ ओहदे थे।बहुत देखा कोई इन्सान न मिला ।।तेव्हा ही गोष्ट आमच्याबाबतीत घडू नये. पहायला गेले तर घरांमध्ये आपल्या जगामध्ये सगळेत काहीना काही करत आहोत. जर काही प्राप्त करत असतील तरी ती आमची उपलब्धी आहे. त्याबरोबर एक विनयशीलता आणि विनम्रतेची भावनाही असावी की, आम्ही जे काही आहोत ते ईश्वर कृपेमुळेच आहोत.आमची जेवढी म्हणून उर्जा आहे तिचा सदुपयोग व्हावा. कोणतीही दौलत आमच्या झोळीमध्ये असेल त्याद्वारे आपण कोणाचे नुकसान करू नये. आगपेटीच्या काडीप्रमाणे बनू नये ज्यामुळे घर जळेल. तेव्हा जर आपण मनुष्य देह घेऊन या जगामध्ये आलो आहोत तर मग या गोष्टीचे सतत स्मरण असायला हवे की, आम्हाला खऱ्या अर्थाने मनुष्य बनायचे आहे.अनेक महात्मा लोकांनी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या आपल्या जीवनात उतरवायच्या आहेत. त्याचबरोबर केवळ आपल्यापर्यंत सीमित न ठेवता हा ज्ञानरूपी प्रकाश जेवढ्यांना देता येईल. त्यांनाही ही उर्जा आणि प्रेरणा द्यायची आहे. पण ही प्रेरणा कशी द्यायची? जिथे गरज आहे तिथे बोलायचेही आहे. परंतु त्या अगोदर आपल्या बुद्धीमध्ये, विचारांमध्ये व्यवहारांमध्ये अंगीकार करून, गोड वाणीद्वारे कोणाचे मन न दुखवता. केवळ अश्रू पुसत आणि शक्य तितके आपण इतरांच्या जीवनाला दिलासा देण्याचा प्रयत्न करु या...संकलन - राजकुमार वाणी, ज्ञानप्रचारक, संत निरंकारी मंडळ, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव