शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मामास १४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 20:52 IST

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : सरकारपक्षाने तपासले १३ साक्षीदार

जळगाव- तुला व तुझ्या कुटूंबीयांना मारून टाकेल अशी धमकी देऊन वारंवार नातलग अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणात आरोपी मामा गणेश पोपट खवले (वय-२४ वर्ष, रा़ म्हसला ता़ सिल्लोड जि़ औरंगाबाद) यास मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़वाय़ लाडेकर यांनी दोषी धरून १४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे़भडगाव तालुक्यातील पीडित मुलीचे वडीलांचे निधन झाल्यानंतर शेती कामात सहकार्य व्हावे यासाठी पीडीताच्या आईने गणेश पोपट खवले यास गावात बोलवून घेतले होते़ मात्र, गणेश याने तुला व तुझ्या कुटूबींयाना मारून टाकेल, अशी धमकी देत पीडीतेवर वांरवार अत्याचार केले़ काही दिवसांनी पोट दुखु लागल्यानंतर तिची रूग्णालयात तपासणी केली असता पीडीता ही गरोदर असल्याचे निष्पन्न झाले़ त्यानंतर कुटूंबीयांनी विचारपूस केल्यानंतर तिने वांरवार झालेल्या अत्याचाराची संपूर्ण हकीकत सांगितली़ त्यानंतर पीडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७६ व ५०६ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम ३, ४, ५ व ६ अन्वये प्रमाणे गणेश खवले याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ अखेर तपासानंतर तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक रवींद्र जाधव यांनी भडगाव न्यायालयात दाखल केले़ त्यानंतर सुनावणीकामी हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़वाय़लाडेकर यांच्या न्यायालयात आला़१३ साक्षीदार तपासलेअत्याचार प्रकरणातील खटल्यात १३ साक्षीदार तपासण्यात आले असून त्यात पीडितेची आई, पीडिता तसेच वैद्यकीय अधिकारी व डी़एऩए तज्ञ आदींच्या साक्षी त्यामध्ये महत्वपूर्ण ठरल्या़ तर न्यायालयाने सरकारपक्षाचा पुरावा व युक्तीवाद ग्राह्य धरून गणेश पोपट खवले याला दोषी धरून मंगळवारी शिक्षा सुनावली आहे़ सरकारपक्षातर्फे अ‍ॅड़ प्रदीप महाजन यांनी कामकाज पाहिले़अशी सुनावली शिक्षानातलग अत्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी न्या़ पी़वाय़ लाडेकर यांनी निकला दिला असून त्यामध्ये आरोपी गणेश खवले याला १४ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे़ त्यामध्ये भादवी कलम ३७६ अन्वये प्रमाणे १० वर्ष सश्रम कारावास, ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ६ महिन्यांची साधी कैद, भादवी कलम ५०६ अन्वये प्रमाणे ३ वर्ष सश्रम कारावास, १ हजार दंड, दंड न भरल्यास १ महिन्याची साधी कैदेची शिक्षा तर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम ३, ४, ५ व ६ अन्वये १४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तर ५ हजार रूपयांचा दंड व दंड न भरल्यास ६ महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे़ ही शिक्षा एकत्र भोगावयाची आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव