शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव येथे बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी अखेर बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:47 IST

कारवाई : पत्रकारांना माहिती पुरविल्याचा ठपका

जळगाव : मालेगाव येथे बंदोबस्तावर असताना पोलिसांविषयी खोटी अफवा पसरवून भीतीची भावना निर्माण केली म्हणून पारोळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी पंकज मकराम राठोड यांना बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी याबाबतचे आदेश शनिवारी उशिरा जारी केले. पोलीस दलाची बदनामी करणारी माहिती पत्रकारांना पुरविल्याचा ठपका राठोड यांच्यावर ठेवण्यात आला आहे.मालेगाव येथे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने स्थानिक बंदोबस्त अपूर्ण पडत असल्याने जळगावहून १३ एप्रिल रोजी १०० पोलीस कर्मचारी पाठविण्यात आले होते. त्यातील पंकज राठोड यांनी जळगाव येथून आलेल्या पोलिसांना कुठलीही सुविधा मिळत नाही, त्यामुळे राजीनामा द्यावा की पळून जावे अशी भीती कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याबाबत माहिती नाशिक येथील पत्रकारांना पुरविली होती. त्याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केलेल्या चौकशीत ही माहिती राठोड याने पुरवून पोलीस दलाची बदनामी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीची भावना निर्माण केल्याचे उघड झाले. त्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाला होता. त्यानुसार डॉ.उगले यांनी पंकज राठोड यांना सेवेतून बडतर्फ केले. मालेगाव येथे असताना तेथून पळून आलेल्या पाच पोलिसांना याआधीच निलंबित करण्यात आले आहे. तेथे तैनात असलेल्या बंदोबस्त शनिवारीच माघारी आला असून एरंडोल येथे ९४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव