जामनेर, जि.जळगाव : नोकरी नसल्याने लग्न जुळण्यास अडचण येत असल्याने भुसावळच्या दोघा भावांनी लढविलेली शक्कल त्यांना चांगलीच अंगलट आली. २० दिवसांपासून दोन तरुण येथील तहसील कार्यालयात येऊन बसत होते. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी दोघांना बोलावून चौकशी केली असता वरील बाब उघडकीस आली.दोघे तरूण सुशिक्षित बेरोजगार व सख्खे भाऊ असून, लग्न जुळण्यास नोकरी अडथळा ठरत होती. यावर त्यांनी शोधलेला तोडगा अफलातून निघाला. आपण जामनेर तहसीलमध्ये नोकरीला असल्याचे त्यांनी सांगितल्याने काही दिवसांपासून कार्यालयात आपणाकडे नवीन नियुक्ती झाली का, अशी विचारणा करणारे फोन येत होते. कर्मचाऱ्यांचा संशय बळावल्याने त्यांनी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी त्यांची चौकशी करून, त्यांना समज देऊन सोडून दिले. नोकरीवालाच नवरा पाहिजे या हव्यासापोटी असे प्रकार होत असल्याचे बोलले जाते.शिपाई असला तरी चालेल...शेतकरी नवरा नको ग बाई! असे म्हणणाºया तरुणी बदलत्या स्थितीत आपली विचारसरणी बदलत असल्या तरी हे प्रमाण पाहिजे तेवढे समाधानकारक नाही. शिपाई असला तरी चालेल पण जावई सरकारी नोकरीवालाच हवा, असा हट्ट जोपासणारे समाजात कमी नाही. त्यामुळेच असे प्रकार घडतात.गेल्या काही वर्षात नोकरभरतीच न झाल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे. आर्र्थिक मंदीमुळे खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी कमी झाल्याने उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने युवकांमध्ये नैराश्य येत असल्याचे दिसत आहे. लग्न होईपर्यंत तरी सरकारी नोकरी मिळावी या हट्टापायी दोघा भावंडांनी ही शक्कल लढविली असावी.
जामनेर तहसीलला नोकरीत असल्याचा केला बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:20 IST
नोकरी नसल्याने लग्न जुळण्यास अडचण येत असल्याने भुसावळच्या दोघा भावांनी लढविलेली शक्कल त्यांना चांगलीच अंगलट आली.
जामनेर तहसीलला नोकरीत असल्याचा केला बनाव
ठळक मुद्देजामनेर येथील प्रकारलग्नासाठी दोघा भावांनी लढविलेली शक्कल आली अंगलट