शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 20:01 IST

धुपे खु., ता. चोपडा येथे गावठी हातभट्टी तयार करण्याचा अड्डा चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून उध्वस्त केला.

ठळक मुद्देधुपे शिवारात गावठी हातभट्टी उध्वस्त.३० हजार ९०० रुपयांचा ऐवज हस्तगत, दोघे ताब्यात.

लोकमत न्यूज नेटवर्क

चोपडा :  धुपे खु., ता. चोपडा या तापी नदीच्या काठावरील गावाच्या शिवारात गावठी हातभट्टी तयार करण्याचा अड्डा चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून उध्वस्त केला. या धाडीत तीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत दोघा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई मानली जात आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, शनिवारी दुपारी २ वाजता धुपे खु. ता. चोपडा शिवारात तापी नदीचे पात्रात तातु उत्तम सोनवणे (४०, धुपे खु.), नारायण बाजीराव अहिर (५२, धुपे चोपडा) हे गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे ३ हजार लिटर कच्चे रसायन व तीस किलो गुळ बाळगुन गावठी हातभट्टीची दारु तयार करीत असताना मिळून आले.

चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात हवालदार मनेष वसंत गावीत यांच्या फिर्यादीवरून तातु उत्तम सोनवणे (४०, धुपे खु)., नारायण बाजीराव अहिर (५२, धुपे)  यांच्याविरुद्ध मुंबई प्रोव्ही ॲक्ट क ६५ ( फ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. डी. वसावे, हवालदार मनीष गावित, किशोर शिंदे, विनोद पाटील यांच्या पथकाने केली. या गुन्ह्यातील दोघां आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास हवालदार संजय येदे हे करीत आहेत. 

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाCrime Newsगुन्हेगारी