शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दिनी भेट! राज्यातील पहिले हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र जळगाव विमानतळावर सुरू होणार

By सचिन देव | Updated: April 9, 2023 21:08 IST

दिल्ली येथे प्रवेशप्रक्रिया सुरू : पुढील आठवड्यात तीन हेलीकॉप्टर जळगावला येणार.

जळगाव : गेल्या वर्षी जळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्ष केंद्र सुरू झाल्यानंतर, आता १ मे महाराष्ट्र दिनापासून हेलीकॉप्टर प्रशिक्षण केंद्रही सुरू होत आहे. हरियाणा राज्यातील गुरूग्राम येथील जेट सर्व्ह एव्हिएशन या कंपनीतर्फे हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येत असून, संस्थेतर्फे या प्रशिक्षण केंद्रासाठी सध्या दिल्ली येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाद्वारे भारतात आणि इतर देशांमध्ये असलेली वैमानिकांची गरज आणि मागणी लक्षात घेता भारतातील सर्व सुविधा असलेल्या विमानतळांवर `फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमी `सुरू करण्यात येत आहे. जळगाव विमानतळार नाईट लॅडिंगसह इतर सर्व सुविधा असल्यामुळे एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संजीवकुमार यांनी जळगाव विमानतळावर हेलीकॉप्टर प्रशिक्षण सुरू होणार असल्याचे गेल्या वर्षी जाहिर केले होते. तसेच  मध्यप्रदेशातील खजुराहो या ठिकाणीदेखील हेलीकॉप्टर प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याचे जाहिर केले होते.या मध्ये  खजुराहो येथील प्रशिक्षण केंद्र गेल्या महिन्यात सुरू झाले असून, जळगावचे प्रशिक्षण केंद्रही आता १ मे पासून सुरू होत आहे.

राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र :

सध्या महाराष्ट्र राज्यात काही खासगी शिक्षण संस्थांचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र आहे. मात्र, यात हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र कुठेही नाही. त्यामुळे केंद्रिय नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे जळगाव विमानतळावर सुरू करण्यात येणारे हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र हे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र ठरणार आहे.

उद्घाटनासाठी केंद्रिय उड्डाणमंत्र्यांना निमंत्रण..

जळगाव विमानतळावर सुरू होणारे हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र हे  केंद्र शासनाने मंजुरी दिलेले राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र असणार आहे. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घटनासाठी जेट सर्व्ह एव्हिएशन व स्थानिक विमानतळ प्रशासनातर्फे केंद्रिय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निमंत्रण दिले असल्याचे सांगण्यात आले.

जळगाव विमानतळावर हेलीकॉप्टर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे. डीजीसीएकडे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत परवानगी मागितलीअसून, येत्या दोन ते तीन दिवसात परवानगी मिळणार आहे. त्यानंतर १ मे पासून हेलिकॉप्टर  प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे. प्रशिक्षणासाठी हेलिकॉप्टर व विद्यार्थी पुढील आठवड्यात जळगावला येतील.- विवेक यादव, ऑपरेशन व्यवस्थापक, जेट सर्व्ह एव्हिएशन, जळगाव विमानतळ.

टॅग्स :Jalgaonजळगाव