शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेना आणि पवार गट लवकरच काँग्रेसमध्ये विलिन होणार ! देवेंद्र फडणवीस यांचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:54 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडीची ना नेता, ना नियत, ना नीती अशी स्थिती आहे.   येत्या काही दिवसात उद्धवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पाचोरा येथे केले.  

- श्यामकांत सराफ  जळगाव - इंडिया आघाडीची ना नेता, ना नियत, ना नीती अशी स्थिती आहे.   येत्या काही दिवसात उद्धवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे भाकित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पाचोरा येथे केले.  आपले तिकिट का कापले याचे आत्मचिंतन करावे, असा टोला त्यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांना मारला.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाचोरा येथील कैला माता मंदिराशेजारी असलेल्या पटांगणावर बुधवारी भर दुपारी सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, इंडिया आघाडी म्हणजे नेता, नियत आणि नीती नसलेली आघाडी आहे. यांच्यात कुणीही पंतप्रधान पदाचे नेतृत्व करण्यासारखे नाही. आघाडीतील प्रत्येक जण स्वतःला पंतप्रधान पदाचे नेते समजतात त्यांच्या इंजिनमध्ये फक्त नेतेच आहेत, तिथे जनतेला बसण्यास जागा नाही. आघाडीतील नेत्यांना कन्व्हीन्सही करता येत नाही म्हणून ते जनतेला कन्फ्युज करत असल्याची टीका त्यांनी केली.

निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद पवार म्हटले आहे.   आता तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धवसेना लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे  भाकीत फडणवीस यांनी केले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४jalgaon-pcजळगावDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४