शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
3
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
4
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
5
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
6
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
7
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
8
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
9
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
10
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
11
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
12
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
13
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
14
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
15
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
16
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
17
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
18
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
19
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
20
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!

पारोळ्याजवळ लक्झरी बसला अपघात, १५ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 16:57 IST

पारोळा शहराजवळ आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर मंगळवारी सकाळी ७.३० वाजता लक्झरी बस उलटून त्यात १५ प्रवासी जखमी झाले. यातील पाच गंभीर जखमींना धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देसमोरून अचानक आलेल्या ट्रकपासून वाचण्याच्या प्रयत्नात उलटली बस ५ गंभीर जखमींना धुळे येथे हलविले

पारोळा : आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर पारोळ्यानजीक हिरापूर फाट्याजवळ समोरून अचानक अंगावर आलेल्या ट्रकपासून वाचण्याच्या प्रयत्नात चालकाने लक्झरी बस रस्त्याच्या साईडपट्टीवर उतरविली, तथापि त्याचे नियंत्रण सुटल्याने सदर बस उलटली. यात १५ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. यातील पाच जणांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे.१९ रोजी सकाळी अमळनेरहून जळगांवकडे जाणारी लक्झरी बस ( क्रमांक- एमएच १९ वाय- ७७६३ ) या वरील चालक मालक सुरेश राजाराम पाटील (६२ रा. देवळी ता अमळनेर ) हे प्रवासी घेऊन पारोळा येथून जळगांवकडे जात असताना सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास महामार्गावर हिरापूर फाट्याजवळ समोरून अंगावर येणाऱ्या ट्रकपासून वाचण्याच्या प्रयत्नात ही लक्झरी बस रस्त्याच्या कडेला साइड पट्टीवर उतरली आणि खड्डयात पडल्याने त्यातील १५ प्रवासी जखमी झाले. या जखमीत तीन बालकांचा व ६ महिलांचा समावेश आहे . जखमींमध्ये मीनाबाई विश्वास पाटील (४५) सुमनबाई संजय पाटील (३७), बाबुलाल संपत पाटील (६८), गौरव विनोद पाटील (७), शीतल विनोद पाटील (२५), राज विनोद पाटील ( ५) , श्रीराम संपत पाटील (७०)सर्व रा. म्हसवे ता. पारोळा तसेच गुलाब बंडू पाटील (५९) नवकाबाई बंडू पाटील (७०) दोन्ही रा. पातरखेडे ता. एरंडोल. साक्षी चंपालाल पाटील (१२), शैला चंपालाल पाटील (२५) दोन्ही रा. भिलाली ता. पारोळा. मंगला संदीप पाटील (४०), संदीप प्रल्हाद पाटील (४५) रा. जळगाव, भास्कर हिरामण पाटील (६३) बहादरपूर ता. पारोळा व चालक सुरेश राजाराम पाटील यांचा समावेश आहेया जखमींना रुग्णवाहिका चालक रोशन पाटील याने प्राथमिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे, डॉ. सुनिल पारोचे, दीपक सोनार, राजू सोनार, राजू वानखेडे यांनी जखमींवर उपचार केले. यापैकी मीनाबाई पाटील, श्रीराम पाटील, मंगला पाटील, बाबुलाल पाटील, गुलाब पाटील या ५ जणांना धुळे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात