जळगाव : शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तरुणी व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तरुण यांच्यात निर्माण झालेल्या प्रेमसंबंधातून या दोघांनी घरातून पलायन केले. हे प्रेमीयुगल रविवारी शहर पोलीस स्टेशनला हजर झाले. २३ जुलै रोजी २१ वर्षीय तरुणी घरातून बेपत्ता झाली होती, याप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद झाली होती, तर दुसरीकडे तरुणाच्या बाबतीतही एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद झाली होती. दोघांनी रविवारी सर्व प्रथम शहर पोलीस स्टेशन गाठून लग्नाचे पुरावे सादर केले. त्यानंतर मुलाची एमआयडीसी पोलिसात तक्रार असल्याने हे प्रेमीयुगुल दुपारी तेथे गेले. दोघांची नोंद स्टेशन डायरीला घेण्यात आली. सज्ञान असल्याने पोलिसांनी त्यांचा जबाब लिहून घेत त्यांना सोडून दिले.
जळगावातील प्रेमीयुगुल लग्न करुन परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 18:30 IST
शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तरुणी व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तरुण यांच्यात निर्माण झालेल्या प्रेमसंबंधातून या दोघांनी घरातून पलायन केले. हे प्रेमीयुगल रविवारी शहर पोलीस स्टेशनला हजर झाले.
जळगावातील प्रेमीयुगुल लग्न करुन परतले
ठळक मुद्देप्रेमप्रकरणामुळे दोघांनी सोडले होते जळगावलग्न केल्यानंतर दोघांनी लावली शहर पोलीस स्टेशनला हजेरीपोलिसांनी घेतला दोघांचा जबाब